नातेसंबंधातील हे आहेत रेड फ्लॅग्ज
Marathi June 14, 2025 03:24 PM

सध्याच्या काळात नातेसंबध टिकवणे हे आव्हानात्नक असून नात्यांमधील संवेदनाच हरवत चालल्या आहेत. याच कारणामुळे अनेकवेळा नात्यांमध्ये दुरावा येतो. त्यामुळे नात्यातील ताण वाढून त्याचे रुपांतर मारझोड, शिवीगाळपर्यंतच न राहता एकमेकांच्या जीवावर उठण्यापर्यंतही जात असल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे. जर हे टाळायचे असेल तर नात्यातील धोके म्हणजेच रेडफ्लॅग्ज कोणते ते ओळखता यायला हवेत.

विश्वास

कोणतेही नाते हे विश्वासावर टिकते. यामुळे नातेसंबधात विश्वास असणे गरजेचे असते. मात्र ज्यावेळी एका पार्टनरकडून दुसऱ्याची फसवणूक होते तेव्हा हाच नात्यातील पहीला रेडफ्लॅग्ज आहे असे समजावे. कारण ज्या व्यक्ती सहज समोरच्याला फसवतात त्या विश्वासू नसतात.

खोटे बोलणे

जर तुमचा जोडीदार सतत तुमच्याशी खोट बोलत असेल आणि तेच खरं असल्याचं भासवत असेल तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीबरोबर आहात हे दाखवणारा हा रेडफ्लॅग आहे. खोटं बोलणं ही सवय नसून स्वभाव असतो. त्यामुळे तुम्ही कितीही वेळा अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष केलंत तरी त्या खोटं बोलणं सोडत नाहीत. अशा व्यक्ती तुमच्या भावनांशी कायम खेळतात.

थट्टा

जर तुमचा पार्टनर सतत तुमची थट्टा करत असेल, इतरांसमोर तुम्हाला कमीपणा येईल असे वागवत असेल तर हा देखील रेडफ्लॅग्ज आहे हे ओळखा. कारण त्याच्या तशा वागण्यामुळे तुमचे मनोबल ढासळू शकते.

तडजोड

जर तुमचा पार्टनर तुमच्या कोणत्याही गोष्टींबरोबर तडजोड करत नसेल त्याला हवं तेच तुमच्याकडून करवून घेत असेल तर सावध व्हा. भविष्यात तुमच्यासाठी ही व्यक्ती डोकेदुखी ठरू शकते हे ओळखा.

समर्थन

जर तुमचा पार्टनर तुम्हाला कोणत्याही कामात सहकार्य करत नसेल, प्रोत्साहन देत नसेल तर तुमचे भविष्य अशा व्यक्तीबरोबर अंधारमय असू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.