प्रत्येक महिन्याचे ते चार ते पाच दिवस महिलांना नकोसे वाटतात, कारण या दिवसात मासिक पाळी येते. मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक महिन्यात महिलांना मासिक पाळी येते. या दिवसात पोटदुखी, क्रॅम्प्स येणे यासारख्या गोष्टींचा त्रास होतो. मासिक पाळीत महिला सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पॉन वापरतात. हल्ली मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिनपेक्षा टॅम्पॉन वापरण्याचे प्रमाण अधिक जास्त आहेत. टॅम्पॉनमुळे कपड्यांना डाग लागण्याची भिती नसते. यामध्ये जास्त प्रवाह शोषून घेण्याची क्षमता असते. असं सर्व असले तरी, टॅम्पॉन वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून संसर्ग टाळता येईल. (Take these precautions when using tampons)
टॅम्पॉन म्हणजे काय?
टॅम्पॉन (Tampon) हे एक मासिक पाळीत वापरायचे उत्पादन आहे. या उत्पादनामुळे मासिक पाळीत योनीमध्ये घालून रक्त आणि योनि स्त्राव शोषण्यासाठी वापरले जाते. हे साधारणपणे कापसापासून बनवले जाते. टॅम्पॉन (Tampon)लहान, दंडगोलाकार आकाराचे असते. मासिक पाळीत हे योनीच्या आत ठेवले जाते.
स्वच्छता –
टॅम्पॉन वापरण्यापूर्वी आणि काढल्यानंतर सर्वात आधी साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.
योग्य प्रकार निवडा –
तुमच्या मासिक पाळीच्या तीव्रतेनुसार योग्य आकाराचा टॅम्पॉन निवडायला हवे. जसे की, Light, Mediun, Large.
वेळेवर बदला –
टॅम्पॉन 4 ते 8 तासांपेक्षा जास्त वेळ वापरू नये. यामुळे त्वचेचे संसर्ग होऊ शकतात.
सुंगधित टॅम्पॉन टाळा –
सुगंधित टॅम्पॉन वापरणे टाळा, कारण यामुळे योनीमार्गातील नैसर्गिक बॅक्टेरियांचे संतुलन बिघडू शकते.
व्यवस्थित काढा –
टॅम्पॉन काढताना, स्ट्रिंग व्यवस्थित धरून हळूवारपणे बाहेर काढा.
एकावेळी एकच टॅम्पॉन –
एकावेळी एकच टॅम्पॉन वापरावे. काही महिलांना एकाचवेळी दोन टॅम्पॉन वापरायची सवय असते. पण, हे आरोग्यासाठी योग्य नाही.
वापरण्याचे फायदे –
तोटे –
हेही पाहा –