सोने आणि चांदीच्या किंमती आणखी एक मोठी वाढ पाहतात
Marathi June 14, 2025 05:25 PM

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोने-चांदी या मौल्यवान धातूच्या किमती सलग तिसऱ्या दिवशीही वाढल्या. इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर वाढत्या तणावादरम्यान शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा दर 2,200 रुपयांनी वाढून 1,01,540 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्तेकडे वळल्याने सोन्याच्या किमती वाढल्या. तसेच चांदीची किंमत 1,100 रुपयांनी वाढून 1,08,100 रुपये प्रतिकिलो (सर्व करांसह) या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. यापूर्वी, 22 एप्रिल रोजी सोन्याची किंमत 1,800 रुपयांनी वाढून 1,01,600 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.