NEET UG 2025: मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवायचा ? सोप्या शब्दात प्रक्रिया समजून घ्या
GH News June 14, 2025 06:06 PM

NEET UG 2025, Medical College Admission: नीट युजी रिझल्ट आणि कट ऑफच्या आधारे मेडिकल कॉलेजात MBBS, BDS, आणि अन्य मेडिकल कोर्सेसच्या प्रवेशासाठी काऊन्सिलिंग प्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रक्रीया ऑल इंडिया कोटा (AIQ) आणि राज्य कोटा अंतर्गत वेगवेगळी आयोजित केली जाते. खाली आपण नीटच्या निकालानंतरच्या प्रवेश प्रक्रीयेला स्टेप बाय स्पेप पाहणार आहोत.

भारतात किती मेडिकलच्या जागा ?

नीट यूजी रिझल्ट मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे देशभरात एकूण ७८० मेडिकल कॉलेजात प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. भारतात साल २०२५ पर्यंत १,१८,१९० MBBS जागा, २७,८६९ BDS जागा, १,२०५ AIIMS जागा आणि २०० JIPMER जागा उपलब्ध आहेत.

NEET UG 2025 रिझल्ट चेक करा

नीट यूजीचा रिझल्ट अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना त्यांचे रोल नंबर, जन्म तिथी आणि अन्य आवश्यक डिटेल्स दाखल करुन स्कोरकार्ड डाऊनलोड करु शकता. स्कोरकार्डमध्ये एकूण गुण, पर्सेटाईल, ऑल इंडिया रँक (AIR),आणि कॅटगरीनुसार रँक सामील होईल, त्या आधारे प्रवेश मिळणार आहे.

काऊन्सिलिंग प्रक्रिया

NEET UG 2025च्या आधारावर मेडिकल कॉलेजात एडमिशन दोन मुख्य कोटा अंतर्गत होते. ऑल इंडिया कोटा (AIQ) आणि राज्य कोटा. ऑल इंडिया कोटा (AIQ) मध्ये 15% सरकारी मेडिकल कॉलेज जागा, सर्व AIIMS, JIPMER, आणि अन्य केंद्रीय संस्थांच्या जागा सामील होतात. तर राज्य कोटामध्ये ८५ टक्के सरकारी मेडिकल कॉलेज जागा आणि सर्व खाजगी,डिम्ड युनिव्हर्सिटी जागा आहेत. AIQ काऊन्सिलिंग जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात वा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची आशा आहे. अचूक तारखांना रिझल्टनंतर MCC द्वारा घोषीत केले जाणार आहे.

शामिल होती हैं. वहीं राज्य कोटा में 85% सरकारी मेडिकल कॉलेज सीटें और सभी निजी/डीम्ड यूनिवर्सिटी सीटें हैं. AIQ काउंसलिंग जुलाई 2025 के अंतिम सप्ताह या अगस्त 2025 के पहले सप्ताह से शुरू होने की उम्मीद है. सटीक तारीखें रिजल्ट के बाद MCC द्वारा घोषित की जाएंगी.

A. ऑल इंडिया कोटा (AIQ) काऊन्सिलिंग

मेडिकल काऊन्सिलिंग कमेटी (MCC) द्वारा ऑल इंडिया कोटा (AIQ) काऊन्सिलिंग आयोजित केली जाणार आहे. काऊन्सिलिंग दरम्यान रजिस्ट्रेशन, चॉइस फिलिंग आणि लॉकिंग, सीट अलॉटमेंट होईल. त्यानंतर अलॉट केले गेलेल्या कॉलेजात रिपोर्ट करावे लागणार आहे., येथे सर्व ओरिजनल डॉक्यूमेंट्स चेक केले जाणार आहे. मेडिकलचा अभ्यास सुरु होणार आहे.

रजिस्ट्रेशन: उमेदवारांना mcc.nic.in वर रजिस्टर करावे लागणार आहे. त्यासाठी NEET रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, आणि अन्य डिटेल्स लागणार आहे.

चॉईस फिलिंग आणि लॉकिंग: उमेदवार त्यांच्या पसंतीचे कॉलेज आणि कोर्स निवडू शकणार आहेत. चॉईस लॉकिंग अनिवार्य आहे. अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.

जागा वाटप: रँक, श्रेणी,आणि चॉईसच्या आधारवर जागा वाटल्या जातात. ही प्रक्रिया अनेक राऊंडमध्ये होत असते. (राऊंड 1, राऊंड 2, मॉप-अप राऊंड, आणि स्ट्रे वॅकेन्सी राऊंड)

रिपोर्टिंग: जागा मिळालेल्या कॉलेजतात निर्धारित वेळेत कागदपत्रे सादर करणे आणि फि भरावी लागणार आहे.

B. राज्य कोटा काऊन्सिंग

प्रत्येक राज्याच्या आरोग्य शिक्षा संचालक वा समकक्ष प्राधिकरण राज्य कोटा काऊन्सिलिंग आयोजित करत असते. संबंधित राज्याची काऊन्सिलिंग वेबसाईटवर रजिस्ट्रेशन (उदा. उत्तर प्रदेशसाठी upneet.gov.in, तामिळनाडु साठी tnmedicalselection.org) करावे लागणार आहे.

डोमिसाईल नियम: बहुतेक राज्यांमध्ये राज्य कोट्यातील जागांसाठी डोमिसाई प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

पसंती भरणे आणि जागा वाटप: AIQ प्रमाणेच, उमेदवार त्यांच्या पसंतीची महाविद्यालये निवडतात आणि जागा रँकनुसार वाटल्या जातात.

अहवाल देणे: वाटप केलेल्या महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क सादर केल्यानंतर प्रवेश निश्चित केला जातो.

खाजगी महाविद्यालये: खाजगी आणि मानीत विद्यापीठांमधील जागा देखील राज्य समुपदेशन अंतर्गत भरल्या जातात. यासाठी कटऑफ सहसा सरकारी महाविद्यालयांपेक्षा कमी असतो.

आवश्यक कागदपत्रे

काऊन्सिलिंग आणि प्रवेशाच्या वेळी आवश्यक कागदपत्रे-

NEET UG 2025 प्रवेशपत्र आणि निकाल स्कोअरकार्ड

इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे

जन्म प्रमाणपत्र

श्रेणी प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS/PwD, लागू असल्यास)

डोमिसाईल प्रमाणपत्र (राज्य कोट्यासाठी)

पासपोर्ट आकाराचा फोटो

आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र

स्थलांतर प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

उमेदवारांना MCC आणि राज्य समुपदेशन वेबसाईटवरील नियमित अपडेट तपासण्याचा सल्ला दिला जातो. कटऑफ आणि सीट अलॉटमेंटची माहिती फेरीनुसार जाहीर केली जाईल. जर उमेदवाराला इच्छित जागा मिळाली नाही, तर तो पुढील फेरीत अपग्रेडचा पर्याय निवडू शकतो

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.