Breakfast Recipe: विकेंडच्या नाश्त्यासाठी बनवा रुचकर 'कॉर्न चीझ पराठा', सोपी रेसिपी
esakal June 14, 2025 07:45 PM
चिझ कॉर्न पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप गव्हाचे पीठ

पाणी (गरजेनुसार)

चिमूटभर मीठ

1 टीस्पून तेल

स्टफिंगसाठी:

1 कप उकडलेले कॉर्न (मक्याचे दाणे)

1/2 कप चीज (चेडर किंवा मोजरेला, खिसलेले)

1 छोटा कांदा (बारीक चिरलेला, पर्यायी)

1/2 टीस्पून हिरवी मिरची (बारीक चिरलेली, चवीनुसार)

1/4 टीस्पून लाल मिरची पावडर

1/4 टीस्पून गरम मसाला

चिमूटभर मीठ

1 टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)

तूप किंवा तेल

चिझ कॉर्न पराठा बनवण्याची कृती

पीठ तयार करा:

  • गव्हाच्या पिठात मीठ आणि तेल घालून मिक्स करा. हळूहळू पाणी घालून मऊ पीठ भिजवा. 10-15 मिनिटे झाकून ठेवा.

स्टफिंग तयार करा:

  • उकडलेले कॉर्न थोडेसे मॅश करा. त्यात खिसलेले चीज, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करा.

पराठा बनवा:

  • पिठाचे 4 समान गोळे बनवा. प्रत्येक गोळा थोडा लाटून त्यात 1-2 टेबलस्पून स्टफिंग भरा. कडा बंद करून पुन्हा हलक्या हाताने लाटा.

तव्यावर भाजा:

  • गरम तव्यावर पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून मध्यम आचेवर खरपूस भाजा.

सर्व्ह करा:

  • गरमागरम पराठा दही, लोणचे किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.