भर दिवसा दुसरीत शिकणाऱ्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न, आराडाओरड केली अन्.., छ.संभाजीनगरमध्ये खळबळ
Marathi June 15, 2025 11:24 AM

छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगर शहरातील न्यू एसटी कॉलनी येथील एका शाळेतील दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मुलाने आराडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा हा डाव फसला. अक्षित अजय सानप असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी दोन अज्ञाताविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आराडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा हा डाव फसला

न्यू एसटी कॉलनी परिसरातील एका शाळेत 7 वर्षांचा अक्षित दुसऱ्या वर्गात शिक्षण घेतो. शाळा दुपारी 12.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असते. शनिवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत सेलिब्रेशनचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यामुळे सर्व मुलांना 2:30 वाजता घरी जाण्याची परवानगी दिली. शाळेतील शिक्षकांनी अक्षितच्या कुटुंबियांना तो घरी येत असल्याची माहितीही दिली.

घटना CCTV कॅमेरात कैद

दरम्यान, शाळा जवळच असल्याने तो एकटाच पायी घरी येत होता. दुपारी 2:45 च्या सुमारास स्कूटीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने अक्षितला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने आराडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा हा डाव फसला. ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक

पिशवीत गावठी कट्टा घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या एकाला रावणवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगरुटोला (लंबाटोला) परिसरातील पांजरा जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर करण्यात आली. रावणवाडी पोलिस पेट्रोलिंगवर असताना एक व्यक्ती पांढऱ्या पिशवीत गावठी कट्टा घेऊन संशयास्पदरीत्या फिरत आहे, अशी माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

पुढे आलेल्या माहितीनुसार राजू हिरालाल मेश्राम (वय 42) रा. मंगरुटोला, ता. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिशवीत लोखंडी बॉडीचा दोन ट्रिगरसह गावठी कट्टा सापडला. या शस्त्राची किंमत 15 हजार सांगण्यात येते. त्याच्याकडे हे शस्त्र कुठून आले याची विचारणा केली असता, त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उभ्या टँकरला भरधाव ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

वाशिमच्या अकोला – हैदराबाद महामार्गावरील मेडशी बाय पास जवळ टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन दोघांचा घटना स्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. धडक देणारा ट्रक चालक आणि सहकारी घटनास्थळून फरार झाले असून ही घटना मेडशी बायपास जवळील सरपंच हॉटेल समोर घडली आहे. यावेळी या ठिकाणी उभ्या असलेल्या टँकरला मालेगावकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने मागच्या बाजूस जबर धडक दिल्याने अपघात घडला. दरम्यान घटनास्थळी मालेगाव पोलीस वेळेत पोहचले असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.