साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 15 जून 2025 ते शनिवार 21 जून 2025
Marathi June 15, 2025 11:25 AM

>> निळा मध्ये प्रमुख

मेष – गोड भाष्य झिल्ला

सूर्य-चंद्र त्रिकोण योग, मंगळ-शनी षडाष्टक योग. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. समस्या निर्माण केल्या जातील. तुम्ही चातुर्य व मधुर भाष्यावर जिंकू शकता. नोकरीत प्रशंसा, कौतुक, बढती. कठीण कामे कराल. धंद्यात वाढ, लाभ. सावधगिरी ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत थोरामोठय़ांचा सहवास.तुमचे मुद्दे विचारात घेतले जातील. डावपेच टाकताना गुप्तता बाळगा. शुभ दि. 15, 16

वृषभ – नोकरीत वर्चस्व

सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध त्रिकोण योग. भावनेच्या आहारी न जाता कामे करा, निर्णय घ्या. नवीन परिचय फसवा असेल. मोह नको. नोकरीत वर्चस्व, नवा बदल करण्याची संधी. धंद्यात वाढ, उधारी नको.राग नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा, पद मिळेल. जवळच्या व्यक्ती अडचणी निर्माण करतील. आपापसांत गैरसमज, क्षुल्लक तणाव राहील. व्यसन नको. खाण्यापिण्याची चंगळ वाढवू नका. शुभ दि. 18, 19

मिथुन – कठीण प्रश्न सोडवा

चंद्र-मंगळ प्रतियुती, चंद्र-शुक्र लाभयोग. किरकोळ अडचणींवर मात करून मोठे यश मिळवता येईल. कठीण प्रश्न सोडवा. नोकरीत चातुर्य, बुद्धीचे कौतुक. नवा बदल शक्य. धंद्यात चांगला जम बसवा. कर्जाच्या वसुलीचे, नव्या कामाचे जमवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत आत्मविश्वास, उत्साह वाढेल. योग्य निर्णय घेता येईल. नवी छत्रछाया निवडता येईल व तयार करता येईल. शुभ दि. 17, 18

कर्क – कायदा मोडू नका

चंद्र-शुक्र लाभयोग, चंद्र-मंगळ प्रतियुती. अनाठायी खर्च टाळा. डोळय़ांची काळजी घ्या. यांत्रिक बिघाडावर पैसा खर्च करावा लागेल. नोकरीमध्ये कामात चूक टाळा, नम्रता ठेवा. धंद्यात अरेरावी नको. हिशेब तपासा. कोणतेही काम करताना कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत शब्द जपून वापरा. शब्द शस्त्र ठरू शकतात. वरिष्ठांना दुखवू नका. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. 15, 19

सिंह – रागावर ताबा ठेवा

सूर्य-चंद्र त्रिकोण योग, चंद्र-गुरू लाभयोग. अडचणींचा बाऊ करू नका. रागावर ताबा ठेवा. ठरवलेली कामे गोड बोलून करून घ्या. थोरामोठय़ांचे सहाय्य, सल्ला मिळेल. नोकरीत दगदग, लाभ, कौतुक, वर्चस्व. धंद्यात आळस नको. भिडस्तपणा नको. वसुली मिळवा. धंदा वाढवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जुन्या चुका सुधारता येतील. विचारांची दिशा योग्य ठेवा. लोकप्रियता मिळवाल. सन्मान मिळेल. घराचे काम करा. शुभ दि. 17, 18

कन्या – प्रवासात सावध रहा

सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-गुरू त्रिकोण योग. राग वाढवणारे, गैरसमज पसरवणारे लोक सहवासात येतील. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल. प्रवासात सावध रहा. व्यसन नको. नोकरीत व्याप तरीही लाभ, यश मिळेल. चातुर्याने पुढे जाता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत जवळच्याच व्यक्ती गरळ ओतण्याचा प्रयत्न करतील. सौम्य भाषेत बोला. प्रभाव, प्रतिष्ठा अधिक वाढेल. शुभ दि. 15, 19

तूळ – मनाप्रमाणे प्रगती

सूर्य-चंद्र त्रिकोण योग, चंद्र-गुरू लाभयोग. बऱ्याच कालावधीनंतर तुम्हाला दिलासा देणारा, यश देणारा व उत्साह वाढवणारा सप्ताह आहे. रेंगाळलेली, अडचणीत असलेली सर्व कामे करा. केस संपवा. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे प्रगती, बदल, लाभ. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांच्या समवेत चर्चा, भेट. प्रतिष्ठा, पद मिळण्याचे आश्वासन. थोरामोठ्यांचे सहकार्य, मैत्री. कुणालाही कमी लेखू नका. शुभ दि. 17, 18

वृश्चिक – अहंकार नको

चंद्र-मंगळ प्रतियुती, चंद्र-हर्षल लाभयोग. आर्थिक सहाय्य मिळेल. अचानक चांगले वागणारे लोक उग्र भूमिका घेतील. मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव. प्रकृतीची काळजी घ्या. मोह, व्यसन नको. नोकरीमध्ये कामात लक्ष द्या. अहंकार नको. धंद्यात उतावळेपणा, थरार नको. कोणताही निर्णय इतरांच्या आग्रहाखातर घेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत विरोध,तणाव, आरोप, कार्यातील चुका निदर्शनास येतील. शुभ दि. 15, 19

धनु – स्पर्धा उच्च प्रतिष्ठा

सूर्य-चंद्र त्रिकोण योग, चंद्र-गुरू लाभयोग. अडचणीत आलेल्या समस्या सोडवा. आळस नको. वेळेला महत्त्व द्या. नोकरीत प्रभाव, चांगला बदल. धंद्यात जम बसेल, लाभ. कर्जाची वसुली करा. जुना वाद, गैरसमज त्वरित मिटवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अनेक गुप्त कारवाया लक्षात येतील, नवे डावपेच कसे टाकायचे याचा विचार करता येईल. बुद्धिचातुर्य वापरा. लोकप्रियता, सन्मान वाढेल. स्पर्धेत उच्च यश. शुभ दि. 15, 17

मकर – चाऊफर उपस्थिती होती

मंगळ-नेपच्यून षडाष्टक योग. चंद्र-शनी युती. स्वतःची व घरातील व्यक्तींची काळजी घ्या. मानसिक-शारीरिक तणाव होईल. कायदा मोडेल असे कृत्य, भाष्य टाळा. नोकरीत दगदग, ताण तरी टिकून रहा. धंद्यात धाडस नको. परिस्थिती सावरून घ्या. मोठा निर्णय कुठेही घेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत वक्तव्य जपून करा. आरोप, नुकसान, प्रतिष्ठा जपा. प्रत्येक दिवस प्रेरणादायी वाटेल, पण चौफेर सावध रहा. शुभ दि. 17, 18

कुंभ – परदेशी दौरा होईल

चंद्र-बुध त्रिकोण योग, सूर्य-चंद्र लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो, तुमचा प्रभाव वाढेल. निर्णय योग्य ठरेल. चातुर्याचे कौतुक होईल. संततीसंबंधी कार्यभाग योग्य प्रकारे होईल. नोकरीत वर्चस्व, लाभ, बदल. परदेशी दौरा.धंद्याला चांगली कलाटणी. मंदी दूर होईल. वसुली करा. केस मिटवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत मुद्दे, डावपेच, मुत्सद्दीपणाचा गवगवा होईल. अनेक समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. स्पर्धेत उच्च श्रेणीचे यश. शुभ दि. 19, 20

मीन – कायदा सर्वत्र पाळा

चंद्र-शुक्र लाभयोग. मंगळ-शनी षडाष्टक योग. किरकोळ अडचणीत वाढ. गोड बोलून कामे करून घ्या. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीमध्ये धावपळ, कामाचा व्याप. धंद्यात लाभ, अहंकारी भाषा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दुसऱ्याच्या सांगण्यावरून कोणतेही भाष्य, वैर, वाद करू नका. शांत डोक्याने विचार करा. तडजोडीचे धोरण ठेवा. शुभ दि. 20, 21

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.