"त्याच्यासमोर आम्ही मराठीत बोलत नाही" तेलुगू सुपरस्टार महेश बाबूविषयी मेव्हणी शिल्पाचा धक्कादायक खुलासा
esakal June 15, 2025 10:45 PM

Entertainment News : बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर. 80-90 च्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या शिल्पाने बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचे भावोजी, तिच्या धाकट्या बहिणीचे पती तेलुगू सुपरस्टार महेश बाबूविषयी धक्कादायक खुलासा केला.

शिल्पाची धाकटी बहीण नम्रताने तेलुगू सुपरस्टार महेश बाबूशी 2004 मध्ये लग्न केलं. इतका मोठा स्टार असूनही महेशचं नम्रताच्या कुटूंबाशी उत्तम संबंध आहेत. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने महेशच्या मराठी भाषेच्या ज्ञानाविषयी खुलासा केला.

ती म्हणाली,"महेशला मराठी सगळं कळतं. कधी कधी तो आम्हाला मराठीत उत्तरही देतो. जेव्हा त्यांचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्हाला काही बोलायचं असेल तर आम्ही त्याच्यासमोर मराठीत बोलायचो पण एकदा नम्रताने आम्हाला सांगितलं की, त्याच्यासमोर बोलू नकोस त्याला व्यवस्थित मराठी समजतं."

"कधी कधी तो नाटक करतो की त्याला काही समजत नाही. पण तसं नाही त्याला मराठी सगळं कळतं. तर आमच्या तिन्ही मुलांना म्हणजे माझी मुलगी अनुष्का, महेश-नम्रताची दोन्ही मुलं सितारा आणि गौतम उत्तम मराठी बोलतात." असं ती पुढे म्हणाली.

शिल्पा अखेरची बिग बॉस मध्ये दिसली होती. तिने मध्यंतरी काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं होतं. पण आता ती अभिनयापासून काही काळ दूर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.