शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यांनी रविवारी शाखा प्रमुखांची शिवसेना भवनात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच आपल्या भागातील मतदारयादीतील किमान ३०० जणांशी संपर्क साधण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
Air India plane crash : रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलीअहमदाबाद येथील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. पण आगीमुळे अनेकांचे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण झाले होते. रविवारी रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. त्यामध्ये डीएनए मॅच झाला आहे. आता त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. आतापर्यंत २१ मृतदेहांची ओळख पटली असून १२ जणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.