नवीन मतदार आयडी कार्ड पंधरवड्यात उपलब्ध असतील.
Marathi June 19, 2025 04:24 PM

निवडणूक आयोगाकडून वितरण प्रक्रियेत सुधारणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राशी (वोटर आयडी) संबंधित प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. मतदारांना आता आपले ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी  जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. तसेच अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्याची गरजही भासणार नाही. आता केवळ 15 दिवसात मतदारांच्या हातात नवीन किंवा अपडेट केलेले ओळखपत्र मिळणार आहे. हा बदल केवळ नवीन कार्डसाठीच लागू होणार नाही, तर नाव, पत्ता, फोटो किंवा वयातील बदलासाठी अर्ज करणाऱ्यांसाठीही लागू होईल.

मतदाराकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 कामकाजाच्या दिवसांत मतदारांना कार्ड दिले जाईल, असे आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत मतदार कार्ड मिळविण्यासाठी कित्येक आठवडे किंवा महिने लागत होते. नवीन प्रणाली अंतर्गत, डेटा पडताळणी, कार्ड प्रिंटिंग आणि वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.