Maharashtra Political Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल
Sarkarnama June 21, 2025 09:45 AM
Amit Shah : मुंबईतील हॉटेल फेअरमॉन्टमध्ये नाफेडचा कार्यक्रम

मुंबईतील हॉटेल फेअरमॉन्टमध्ये नाफेडचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

Shivsena News : राज्यातील संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखाच्या बैठकीत केल्या सूचना

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांची बैठक शिवसेना भवन येथे झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा, असे सांगितले. त्यासोबतच मनसे सोबतच्या युतीसाठी सकारात्मक असून युती झाली नाही तर मुंबईतील सर्व जागावर निवडणूक लढण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Tejswi Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर होते संचालकपद रिक्त

मुंबई बँकेच्या संचालकपदी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची ही जागा रिक्त होती. ठाकरे सेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर हे २०१२–२०१७ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते आणि त्याचवेळी ते मुंबई बँकेचे संचालक होते. अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.