लोकसभा-विधानसभा निवडणुकीत भाजपने पाण्यासारखा उधळला पैसा; तब्बल 1494 कोटी केले खर्च, तर काँग्रेसकडून 620 कोटी खर्च
esakal June 21, 2025 06:45 PM

Association for Democratic Report : भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. भाजपने तब्बल १४९४ कोटी रुपये खर्च केले. तर, ११ वर्षांपासून केंद्रात सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसनेही निवडणुकीत चांगला पैसा खर्च केला. काँग्रेसने(Congress) एकूण ६२० कोटी रुपये खर्च केले.

एकट्या भाजपचा खर्च ४४.५६ टक्के

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिपोर्ट (ADR) नुसार, एकूण निवडणूक खर्चात एकट्या भाजपचा वाटा जवळजवळ अर्धा आहे. ४४.५६ टक्के खर्च भाजपने केला, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने ६२० कोटी रुपये खर्च केले, जे एकूण खर्चाच्या १८.५ टक्के होते. एडीआरनं म्हटलंय, की राजकीय पक्षांनी ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला.

ऐतिहासिक निर्णय! ब्रिटनच्या संसदेत इच्छामरण विधेयकाला मंजुरी; विधेयकाच्या बाजूनं अन् विरोधात किती मतदान? लोकसभा आणि चार विधानसभा निवडणुकांचा तपशील

एडीआरनं १६ मार्च ते ६ जून २०२४ दरम्यान झालेल्या लोकसभा आणि चार राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या खर्चाचा हिशेब दिला आहे. या निवडणुकांमध्ये एकूण ३३५२.८१ कोटी रुपये खर्च झाले. राष्ट्रीय पक्षांनी २२०४ खर्च केले, जे एकूण खर्चाच्या ६५.७५ टक्के आहे. या सर्वाधिक रक्कम प्रचारावर खर्च झाली.

अहवालानुसार, २ हजार कोटींहून अधिक रक्कम प्रचारावर खर्च झाली. सर्व पक्षांनी २००८ कोटी रुपये प्रचारावर खर्च केले. जे एकूण खर्चाच्या ५३ टक्के आहे. सर्व पक्षांनी प्रवासावर ७९५ कोटी रुपये खर्च केले. स्टार प्रचारकांच्या प्रवासावर ७६५ कोटी रुपये खर्च झाले, तर कार्यकर्त्यांवर फक्त ३० कोटी रुपये खर्च झाले.

Yoga Day : 'योगामुळे आपल्यातला अहंकार नष्ट होतो...'; PM मोदींनी जगात सुरू असलेल्या संघर्षाचा केला उल्लेख, योगाचंही सांगितलं महत्त्व राष्ट्रीय पक्षांनी उभारले ६९३०.२५ कोटी

एडीआरनं त्यांच्या अहवालात म्हटलंय की, निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय पक्षांनी ६९३०.२५ कोटी रुपये उभारले, तर प्रादेशिक पक्षांनी ५१५.३२ कोटी रुपये उभारले. उमेदवारांना ४०२ कोटी रुपये रोख मिळाले. उमेदवार आणि पक्षांनी व्हर्च्युअल प्रचारात १३२ कोटी रुपये खर्च केले.

निवडणुकीत ६९० अज्ञात पक्षांचा सहभाग

एडीआरच्या अहवालानुसार, लोकसभा निवडणुकीत ६९० अज्ञात पक्षांनी भाग घेतला, परंतु त्यांच्या खर्चाची माहिती अहवालात समाविष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, झारखंड मुक्त राजकीय पक्षांना निवडणूक खर्चाचा तपशील ९० दिवसांच्या आत सादर करावा लागतो, परंतु अनेक पक्षांनी खर्चाचा तपशील आयोगाला उशिरा सादर केला. आपने १६८ दिवसांनी आपला अहवाल सादर केला. भाजपने १५४ दिवसांत आपला अहवाल सादर केला. फक्त काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेचा तपशील वेळेवर सादर केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.