‘स्वामी स्वरुपानंद’ पतसंस्थेत
पहिल्या दिवशी दीड कोटी ठेवी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाचा प्रारंभ झाला. आज पहिल्याच दिवसभरात १ कोटी ४८ लाखांच्या नव्या ठेवी संकलित झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास २० जून ते २० जुलै या कालावधीत होणार आहे. या ठेव महोत्सवाचा प्रारंभ गुंतवणूकदारांनी केला. संस्थेच्या सर्व १७ ही शाखांमध्ये ठेवीदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ९५ ठेवीदारांनी मिळून रुपये १ कोटी ४८ लाखांच्या नवीन ठेवी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांमध्ये गुंतवल्या. ८.२५ टक्के ते ९ टक्के व्याजदराच्या विविध ठेव योजना ठेवीदारांच्या पसंतीस उतरलेल्या दिसत आहेत.
आज प्रत्येक शाखेत ठेवीदारांची लगबग सुरू होती. ठेवीदारांच्या स्वागतासाठी पतसंस्थेचे कर्मचारी, अधिकारी सज्ज होते. ठेवीदारांच्या मनात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेबद्दल असलेला स्नेह, विश्वास याचे प्रत्यंतर जाणवत होते. हा उत्साह पुढील संपूर्ण महिना अशाच पद्धतीने राहील, असा विश्वास ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.