Jasprit Bumrah ठरतोय हुकमी एक्का! SENA देशातील सर्वात यशस्वी आशियाई गोलंदाज, पाकिस्तानच्या दिग्गजाला टाकलं मागे
esakal June 22, 2025 07:45 AM

जसप्रीत बुमराह हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज समजला जातो. त्याने वेळोवेळी भारतासाठी खेळताना हे सिद्धही केले आहे. त्याच्या नावावर मोठे विक्रमही असून आता यात आणखी एका मोठ्या विक्रमाची भर पडली आहे.

हेडिंग्लेमध्ये शुक्रवारपासून (२० जून) इंग्लंड आणि भारत संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, बुमराहने मोठा विक्रम नावावर केला आहे.

ENG vs IND, 1st Test: शतके तीन अन् विक्रम अनेक! गिल, पंत, जैस्वाल दिग्गजांच्या पंक्तीत; मोडले १० मोठे रेकॉर्ड

या सामन्यात भारतानेप्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. भारताने पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल (१०१), शुभमन गिल (१४७) आणि रिषभ पंत (१३४) यांच्या शतकाच्या जोरावर ११३ षटकात सर्वबाद ४७१ धावा केल्या.

त्यानंतर इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंडकडून झॅक क्रावली आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात केली. पण पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने झॅक क्रॉवलीला ४ धावांवर बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला.

मात्र, त्यानंतर डेकटला साथ मिळाली ती ऑली पोपची. या दोघांनी संयमी खेळत केला. त्यांना नशीबाचीही साथ मिळाली. १५ धावांवर असताना डकेटचा झेल जडेजाकडून सुटला. त्याचा त्याने फायदा घेतला. डकेट आणि पोप यांच्यात १२२ धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी झाली.

अखेर त्यांची भागीदारीही बुमराहनेच तोडली. त्याने डकेटला २९ व्या षटकाट अप्रतिम चेंडू टाकत त्रिफळाचीत केले. डकेटने ९४ चेंडूत ९ चौकारांसह ६२ धावांची खेळी केली.

दरम्यान, या दोन विकेट्समुळे बुमराह सेना (SENA) देशातील म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमधील सर्वात यशस्वी आशियाई गोलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तानच्या वासिम आक्रमला मागे टाकत सेना देशात सर्वाधिक विकेट्स घेणारा आशियाई गोलंदाज बनण्याचा विक्रम केला.

या चार देशात बुमराहच्या आता कसोटीत ३२ सामन्यात १४७ विकेट्स झाल्या आहेत. वासिम आक्रमने ३२ सामन्यांत १४६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ अनिल कुंबळे आहे. त्याने ३५ कसोटीत १४१ विकेट्स घेतल्या आहेत.

ENG vs IND, 1st Test: कॅप्टन गिल ऑन फायर! पतौडींचा ५८ वर्षे जुना विक्रम मोडत घडवला नवा इतिहास सेना (SENA) देशात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे आशियाई गोलंदाज
  • १४७ विकेट्स - जसप्रीत बुमराह (३२ कसोटी)

  • १४६ विकेट्स - वासिम आक्रम (३२ कसोटी)

  • १४१ विकेट्स - अनिल कुंबळे (३५ कसोटी)

  • १३० विकेट्स - इशांत शर्मा (४१ कसोटी)

  • १२३ विकेट्स - मोहम्मद शमी (३४ कसोटी)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.