दुबई : इराणमध्ये अडकलेल्या आप्तस्वकीयांशी संवाद साधल्यानंतर एखाद्या रोबोच्या माध्यमातून निर्मिल्या गेलेल्या आवाजातून उत्तर मिळत आहे. काही ठिकाणी तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ‘एआय’चा वापर करून तयार केलेला आवाज वापरला जात आहे.
या विचित्र अनुभवामुळे मूळचे इराणमधील मात्र परदेशात कामानिमित्त, शिक्षणानिमित्त असलेले नागरिक धास्तावले आहेत. त्यांना आपल्या पालकांची, नातेवाइकांची चिंता लागून राहिली आहे. सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेली इराणी वंशाच्या एलीने तिच्या तेहरानमधील आईला फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेच्या यांत्रिक स्वरूपातील आवाजात तिला उत्तर मिळाले. ‘अलो? अलो..’ असे त्या आवाजाने विचारले.
‘मी तुम्हाला ऐकू शकत नाही,’ असे उत्तर पलीकडून आले. ‘कोण बोलत आहे,’ असे एलीने विचारले असता, ‘आय एम अलिसिया..’ असे उत्तर आले. ‘तुम्ही मला ओळखत नाही,’ असेही हा आवाज मिळाला. ४४ वर्षीय एली ही परदेशात राहणाऱ्या नऊ इराणी नागरिकांपैकी एक आहे. गेल्या आठवड्यात इस्राईलने इराणवर हवाई हल्ले केल्यापासून, जेव्हा त्यांनी इराणमधील त्यांच्या प्रियजनांना फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना विचित्र, यांत्रिक आवाज ऐकू आले आहेत. त्यांनी जागतिक माध्यमांना आपली कहाणी सांगितली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण नाव सांगण्यास नकार दिला.
‘एपी’ या वृत्तसंस्थेने ज्या पाच तज्ज्ञांना ही रेकॉर्डिंग ऐकवली. त्यापैकी प्रत्येकाने सांगितले की हे ‘एआय’द्वारा तयार केलेले आवाज असू शकतात किंवा मग आधीच रेकॉर्ड केलेले संदेश असू शकतात. विदेशातून येणारे कॉल हे डायव्हर्ट करण्यात आले आहेत. या ऑपरेशनमागे कोण आहे हे अजूनही स्पष्ट नाही. काही जणांच्या अंदाजानुसार त्यामागे इराण सरकार असावे, किंवा मग इस्राईलकडूनही हे प्रकार होत असावेत. इस्राईलने इराणच्या अणु आणि लष्करी इमारतींवर केलेल्या हल्ल्यांनंतर आता इराणमधील नागरिकांना असे अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे.
इराणने शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सच्या हल्ल्यांनी प्रतिकार केला आहे. सरकारने देशव्यापी इंटरनेट बंद केले आहे. त्यामुळे सामान्य इराणी नागरिकांना बाह्य जगातील माहिती मिळणे अशक्य झाले आहे आणि त्यांच्या नातेवाइकांना त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही.
‘‘हे का करीत आहेत ते समजत नाही,’’ असे एली म्हणाली. एलीची आई मधुमेहाची रुग्ण असून, तिच्याकडे असलेले इन्शुलिन संपत चालले आहे. तेहरानच्या परिसरात ती अडकून पडली आहे. ती आईला शहर सोडून जाण्यास सांगू इच्छिते; पण ते तिला कळवू शकत नाही, अशी सद्यस्थिती आहे.
Chh. Sambhajinagar News : संभाजीनगरात प्रशासनाच्या कारवाईनंतर आता नागरिक रस्त्यावर वारंवार एकच संदेशबहुतेक संवाद इंग्रजीमधून होत आहे, तर काही वेळा फारसीतूनही कृत्रिम आवाज ऐकायला येत आहे. हा फोन कट न करता सुरू ठेवल्यास एकच संदेश वारंवार ऐकायला येतो. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेला एलीप्रमाणेच संदेश ऐकायला आला आहे. ‘‘आईला फोन करून तिचा आवाज ऐकण्याची अपेक्षा करत असताना एआय आवाज ऐकणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात भयावह अनुभव आहे,’’ असे ती म्हणाली. लंडनमध्ये राहणाऱ्या एका महिलेने इराणमध्ये आईला घाईघाईने फोन केला, तर त्याऐवजी तिला रेकॉर्ड केलेला संदेश ऐकू आला.