Kolhapur: काेल्हापूर जिल्ह्यात वाढल्या १४८ सहकारी संस्था; करवीर, कागल, राधानगरी तालुक्यात सर्वाधिक, यंदा झाली घट
esakal June 23, 2025 11:45 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील दुग्ध, मत्स्य, कुक्कुट, शेळी-मेंढी पालन संस्था अशा वर्षात १४८ सहकारी संस्थांची वाढ झाली. करवीर, कागल खालोखाल राधानगरी तालुक्यात ही संख्या आहे. २०२५ मध्ये ६३२९ संस्था सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांच्याकडे नोंद आहेत. जिल्ह्यात २.३६ टक्के सहकारी संस्थांची वाढ झाली आहे. या ना त्या कारणामुळे जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ८० सहकारी संस्थांची घट झाली आहे.

Satara News:'धबधब्याजवळ जाण्यासाठी तरुणाई घालतेय जीव धोक्यात'; वजराई भांबवलीतील स्थिती; पुढे धोका असूनही दुर्लक्ष

जिल्ह्यातील सहकार दुग्ध विभागाकडे मत्स्य, दुग्ध, कुक्कुट, शेळीमेंढी अशा संस्थांची नोंदणी होते. यासाठी काही अनुदानही असते. अलीकडेच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. काही गावपातळीवर, काही तालुका तर काही जिल्हास्तरावर संघ उभारले जातात. त्यात अनेक संचालक मिळून कारभार करतात. यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी-नियमांच्या आधारावर संस्था चालवाव्या लागतात.

जिल्ह्यातील आर्थिक चढ-उतार हा तेथील संस्थांच्या व्यवसायावर अवलंबून असतो. जिल्ह्यात एकूण ६ हजार २३८ प्राथमिक दुग्ध संस्था आहेत. जिल्हा व तालुकास्तरावरील दोन संस्था आहेत. याचप्रमाणे जिल्हा व तालुकास्तरावर एक मत्स्य संघ आणि एक कुक्कुट संघ आहे. प्राथमिक संस्थात मत्स्य संस्था ६३ आणि १० कुक्कुट पालन संस्था आहेत. शेळी-मेंढी पालन प्राथमिक संस्था एकूण १४ आहेत.

तालुका * २०२४ ची संख्या *२०२५ ची संख्या वाढ* २०२४-२५ मध्ये घट * २०२५ अखेरची संख्या * टक्केवारी

आजरा * ३२१* १२* १* ३३२* ३.७४

करवीर * ९४४* २३* ६* ९६१* २.४४

कागल * ६९९* १९* १*७१७* २.७२

गगनबावडा * १५४* ३* ५*१५२* १.९५

गडहिंग्लज*४२३* १३* ७*४२९* ३.०७

चंदगड *४६३* ९* ६*४६६* १.९४

पन्हाळा * ६९३* १३*१५*६९१* १.८८

भुदरगड * ६६०* ९*९*६६०* १.३६

राधानगरी * ७७५* १६* ११*७८०* २.०६

शाहूवाडी * ५००* ८* १४*४९४* १.६०

शिरोळ * ३२७* १२* १*३३८* ३.६७

हातकणंगले *३०२* ११* ४*३०९* ३.६४

---------------------------------------

एकूण *६२६१*१४८*८०*६३*२९*२.३६

-------------------------------------

Success Story: 'अंगणवाडी सेविका ५४ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण'; गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द, इच्छाशक्ती प्रबळ

जिल्ह्यात प्रतिवर्षी सहकारी संस्थांत चढ-उतार होतो. काही संस्था बंद पडतात, तर काही संस्था नव्याने सुरू होतात. विशेष करून करवीर, कागल, राधानगरी तालुक्यात अधिक प्रमाणात संस्था आहेत. संस्थांची संख्या कमी होण्याचे प्रमाण हे कमी असून, वाढ होण्याचे प्रमाण अधिक आहे.

- प्रदीप मालगावे, सहकार उपनिबंधक, दुग्ध

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.