बीएनएन महाविद्यालयात योगअभ्यास
esakal June 23, 2025 10:45 PM

वज्रेश्वरी (बातमीदार): बीएनएन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या जिमखाना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध योग प्रशिक्षक स्वामी प्रेमस्वरूप चैतन्य यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिक दाखवत शारीरिक, मानसिक फायदे विद्यार्थ्यांना सांगितले. तर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा रावळ यांनी योग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून दररोज योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.यावेळी उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, डॉ. सुरेश भदरगे, डॉ. निनाद जाधव डॉ. कुलदीप राठोड, यांच्यासह कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.