Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात ओव्हर हेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, मुंबईकरांचे भर पावसात हाल
Saam TV June 24, 2025 01:45 PM

मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील ओवर पेंटग्राम , ओवर हेड वायर तुटल्याने वाहतूक खोळंबली आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकामध्ये ओवर पेंटग्राम , ओवर हेड वायर तुटली असल्यानं CSMTकडे जाणारी जलद रेल्वे मार्गाची वाहतूक खोळंबली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9.55 वाजता वायर हेड तुटल्याची घटना घडलीय. यामुळे जलद मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. कुर्ल्याच्या पुढे कल्याण दिशेने ट्रेन एका पाठोपाठ उभ्या आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

ज्या ठिकाणी म्हणजे फलाट 6 वर रेल्वे वाहतूक बंद पडली आहे. त्या मार्गावरील सीएसएमटीकडे जाणारी लोकल ट्रेन वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहे. कल्याणवरून csmt जाणाऱ्या सर्व ट्रेन 4 वरून वळवण्यात आल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.