-मेहनत व अभ्यासातील सातत्य विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे
esakal June 25, 2025 07:45 AM

- rat२४p१.jpg-
P२५N७२६८३
रत्नागिरी ः शिर्के प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अॅड. विजय साखळकर आणि अन्य मान्यवर.

अभ्यासात सातत्य ठेवणे महत्त्वाचे
अॅड. पाटणे ः शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः मेहनत आणि अभ्यासातील सातत्य हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्व आहे. एलन मस्क, लक्ष्मी पिचई आणि सुंदर पिचई या विश्वविख्यात कर्तृत्ववान व्यक्ती कष्ट, जिद्दीच्या जोरावर यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचलेल्या आहेत, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशाला, श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर ज्युनिअर कॉलेज आणि अॅड. बाबासाहेब नानल गुरूकूल प्रकल्पातील २०२४-२५ मधील १०वी व १२वीमधील विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उप-कार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, नियामक मंडळाचे सदस्य व शाळा समिती सदस्य सचिन वहाळकर, डॉ. केतकर, संतोष गुरव, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक दत्तात्रय वालावलकर, संस्थेचे आजीव सभासद विनोद मयेकर, मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा काजरेकर यांनी केले.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.