आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 जून 2025
esakal June 25, 2025 02:45 PM

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ५.४४, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय सकाळी ६.११, चंद्रास्त सायंकाळी ७.३२, दर्श अमावास्या, समाप्ती दु. ४.०२, भारतीय सौर आषाढ ४ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००० - मादाम तुसाँ यांच्या मेणाच्या पुतळ्यांच्या जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळविणारा ते पहिले हिंदी अभिनेता ठरले.

  • २०१४ - आपल्या अवकाशगंगेतील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ताऱ्याचा शोध लागल्याचा दावा लंडन येथील नॅशनल रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी ऑब्झरव्हेटरीमधील शास्त्रज्ञांनी केला. या ताऱ्याचा आकार पृथ्वीएवढा असून, तो आजपर्यंत सापडलेल्या बटू ताऱ्यांपेक्षा अतिप्रचंड प्रमाणात थंड आहे. या ताऱ्याचे वय ११ अब्ज वर्षे असून, हा पांढरा बटू तारा हिऱ्यापासून बनलेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.