तोंडवली फार्मसीचा निकाल १०० टक्के
esakal June 26, 2025 01:45 AM

73060

तोंडवली फार्मसीचा निकाल १०० टक्के
नांदगाव, ता. २५ ः तोंडवली (ता.कणकवली) येथील श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ डी. फार्मसी पदविका प्रथम व द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. कॉलेजमधून प्रथम वर्षात अनुराधा कुशवाह (७१.१० टक्के) व व्दितीय वर्षात आफियाबानू काझी हीने ७९.१८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या डिप्लोमा इन फार्मसी (पदविका) अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यातील शैक्षणिक वर्षे २०२४-२५ या वर्षामध्ये पदविका अभ्यासक्रमाच्या दोन्ही वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम वर्षामध्ये अनुक्रमे अनुराधा कुशवाह (७१.१०), स्वाती बादिगर (७०.७०), सुवर्णा होलमुखे (७०.४०) यांनी यशसंपादन केले. पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये अनुक्रमे आफियाबानू काझी (७९.१८), सुररैया बटवाले (७७.६४) आणि प्रार्थना मोचेमाडकर (७४.९१) गुणांनी उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखील सावंत, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. तुकाराम केदार तसेच पदविका विभागाचे प्रमुख संजय चोथे, परीक्षा विभाग प्रमुख सुशांत शेटे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.