'भंडाऱ्याचे हॉटेल'वर वाचकांकडून चर्चा
esakal June 26, 2025 01:45 AM

73002

‘भंडाऱ्याचे हॉटेल’वर वाचकांकडून चर्चा
सावंतवाडी, ता. २५ ः साहित्यिक (कै.) जयवंत दळवी जन्मशताब्दी प्रीत्यर्थ आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या खुल्या साहित्य चर्चेत नुकतीच जयवंत दळवी यांच्या ‘भंडाऱ्याचे हॉटेल’ या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा साहित्यिक विनय सौदागर यांनी या पुस्तकाविषयी माहिती दिली. ललित स्वरूपाच्या या पुस्तकात समाविष्ट २६ लेखांपैकी निवडक लेखांमधील महत्वाच्या भागांविषयी सविस्तर विवेचन करून निवडक भागांचे वाचनही केले. सरोज रेडकर यांनी या पुस्तकातील ‘भंडाऱ्याचे हॉटेल’ या लेखाचा सारांश कथन केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे, प्रा. गजानन मांद्रेकर, चोखंदळ वाचक गिरिधर राजाध्यक्ष, जयदीप देशपांडे तसेच ग्रंथप्रेमी एकनाथ शेटकर, दिलीप पांढरे, यशवंत गिरी आणि मोहन जाधव यांनी भाग घेतला. खुल्या साहित्य चर्चेतील २९ व्या पुस्तकावरील या चर्चेच्या प्रारंभी श्री. सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर शेवटी सचिन गावडे यांनी ऋणनिर्देश केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.