केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार आहे. त्यानुसार फेब्रुवारीत पहिल्यांदा आणि मे महिन्यात दुसऱ्यांदा परीक्षा होणार आहे.
शेलारांचा पवारांवर निशाणागैरसमजाच्या प्रकाराचे बळी खूप जण आहेत. पाचवी, सहावी, सातवी हिंदी सक्ती आहेच, होतीच. पहिलीपासून या राज्यात हिंदीची सक्ती नाही. त्यामुळ शरद पवार साहेब तुम्ही सुद्धा ही सक्ती नाही हे समजून घेतलं पाहीजे. राज्य सरकारचा निर्णय आहे, पाचवी, सहावी, सातवीला जी हिंदी सक्ती होती. ती पण आता ऐच्छिक आणि पर्याय म्हणून उपलब्ध केली. हा राज्य सरकारचा निर्णय आहे. अभ्यासाविना बोलणाऱ्या शरद पवारांच्या हेतूवरच शंका घ्यावी लागेल, आता मला असं वाटतय. असं शेलार यांनी म्हटलं आहे.
पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरीपुणे शहराच्या मेट्रो विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या आपल्या पाठपुराव्याला यश आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे.