ENG vs IND : सचिन तेंडुलकरचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, जो रुट क्रिकेटच्या देवाला पछाडणार!
GH News June 26, 2025 03:05 AM

टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक विक्रम केले. सचिनला निवृत्त होऊन अनेक वर्ष लोटली. मात्र त्यानंतरही सचिनचे अनेक विक्रम अबाधित आहेत. सचिनने केलेले वर्ल्ड रेकॉर्ड आजही कायम आहेत. मात्र सचिनचे काही विक्रम ब्रेक होऊ शकतात, हे इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने दाखवून दिलं आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत जो रुट सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करु शकतो. रुटने काही विक्रमांबाबत वेस्टइंडिजचा माजी दिग्गज शिवनारायण चंद्रपॉल याची बरोबरी केली आहे. आता रुट सचिनला पछाडण्याच्या वाटेवर आहे.

कसोटीत सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने टेस्टमध्ये सर्वाधिक 51 शतकं झळकावली आहेत. सचिनचा हा विक्रम आणखी काही वर्ष कायम राहू शकतो. सचिनच्या या महारेकॉर्डच्या आसपासही कुणी नाही. तसेच कसोटीत सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिनने टेस्टमध्ये 68 अर्धशतकं केली आहेत. सचिननंतर या यादीत दुसर्‍या स्थानी चंद्रपॉल विराजमान आहे. चंद्रपॉलने 66 अर्धशतकं केली आहेत. रुटने चंद्रपॉलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.