वैराग : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी ता. २४ जून रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे बार्शी तालुक्यातील आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. मात्र, या महामार्गाला शेतकऱ्यांमधून विरोध वाढतच असून २६ जून रोजी माजी खासदार राजू शेट्टी हे शक्तिपीठाला विरोध दर्शनासाठी आंबेगाव येथे उपस्थित होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अहिल्यानगर हादरलं! आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतील विद्यार्थ्याचा खून; दुपारच्या सुट्टीत 'या' कारणावरुन भांडण अन्....शक्तिपीठ महामार्गाचे सोलापूर जिल्ह्यातून १५४ किमी अंतर असून त्यापैकी बार्शी तालुक्यातून ३० किमी अंतर आहे. बार्शी तालुक्यातील सुमारे सात गावांतील साडेपाचशे शेतकऱ्यांची ५०० हेक्टर जमीन रस्त्यांसाठी जाणार आहे. बार्शी तालुक्यातील गौडगाव, रुई, आंबेगाव, जवळगाव, हत्तीज, चिंचखोपन, शेळगाव आर., अशा सात गावांचा यात समावेश आहे.
मंगळवारी शेळगाव (आर) शिवारात व वाणेवाडी येथील शेतीची मोजणी करण्यासाठी अधिकारी दाखल झाले होते. याला बाधित शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध झाला. मात्र, २६ रोजी पुन्हा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना यासंदर्भात नोटीस बजावण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच तीन जुलै रोजी शेळगाव, वाणेवाडी परिसरातील शेतीची मोजणी होणार आहे. मात्र या मोजणीला आमचा कायम विरोध राहणार असल्याचे या गावांमधील शेतकऱ्यांनी सांगितले.
जुन्नर तालुका हादरला! 'जुन्नरमधील कोकण कड्यावरून उडी मारून दोघांनी संपवले जीवन'; रूपालीने मृत्यूपूर्वी लिहीली चिठ्ठी..सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आपली एकजूट वाढवावी. आम्हाला गुरुवारी प्रशासन नोटीस बजावणार असल्याचे कळाले. बार्शी तालुक्यातील सात गावांचा शक्तिपिठामध्ये समावेश आहे. देशात लोकशाही आहे, जे संघटित आहेत, त्यांची जमीन, जीवन सुरक्षित आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटित व्हावे. गुरुवारी आंबेगाव येथे माजी खासदार राजू शेट्टीदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत .
- विजयकुमार पाटील, शेतकरी, हत्तीज, ता. बार्शी