Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीतील घसरणीमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर शुक्रवारी घसरणीसह उघडले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरमधील किंचित वाढ झाली तसेच इस्रायल-इराणमधील युद्धविराम यामुळे सोन्याच्या दरांवर दबाव आला.
एमसीएक्सवर ऑगस्ट वायदा सोन्याचा भाव 0.85% घसरणीसह 96,261 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला, तर मागील बंद भाव 97,087 रुपये होता. एमसीएक्सवर जुलै वायदा चांदीचा भाव देखील 0.11% घसरणीसह 1,06,629 रुपये प्रति किलोवर उघडला, तर मागील बंद भाव 1,06,755 रुपये होता.
सकाळी 9:10 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा भाव 946 रुपयांनी किंवा 0.97% घसरणीसह 96,141 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता, तर एमसीएक्स चांदीचा भाव 482 रुपयांनी किंवा 0.45% घसरणीसह 1,07,415 रुपये प्रति किलोवर होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्थितीआंतरराष्ट्रीय बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमती घसरल्या असून सलग दुसऱ्या आठवड्यात घसरणीकडे वाटचाल करत आहेत. स्पॉट सोन्याचा भाव 0.4% नीचांकी 3,313.23 डॉलर प्रति औंसवर आला. या आठवड्यात सोन्यामध्ये 1.7% घट झाली आहे. यूएस सोन्याचा वायदा 0.7% नीचांकी 3,325.70 डॉलरवर आला. स्पॉट चांदी 36.63 डॉलर प्रति औंसवर स्थिर होती. डॉलर त्याच्या प्रतिस्पर्धी चलनांच्या तुलनेत 0.2% वाढला, ज्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी डॉलर-किमतीतील बुलियन अधिक महाग झाले.
सोन्याच्या दराचे अंदाजकमॉडिटी मार्केट एक्सपर्ट जिगर त्रिवेदी यांच्या मते, ऑगस्ट वायदा एमसीएक्स सोन्याला 95,800 - 95,600 रुपये पातळीवर सपोर्ट मिळण्याची म्हणजेच या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्ली येथील सोन्याचे भावदेशाची राजधानी दिल्ली येथील आजचे 24 कॅरेट सोन्याचे भाव 95970 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 87973 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
आजचे मुंबईतील सोन्याचे भावआज देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील ( Gold Rate Mumbai) 24 कॅरेट सोन्याचे भाव 96140 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 88128 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. यासोबतच चांदीचे भाव 106600 रुपये प्रति 1 किलो इतके आहे.