सक्रिय कोविड संख्या घटली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या कमी होत आहे. जून महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५००च्या वर गेली होती; परंतु आता ही संख्या कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात १८८ सक्रिय कोविड रुग्ण आहेत. या वर्षी मे आणि जून महिन्यात कोविडचे रुग्ण वाढले असून मुंबईत मे महिन्यात ४३५ तर जूनमध्ये ५३९ जणांना संसर्ग झाला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, नवीन रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. त्याचबराेबर सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत ९१ टक्के रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत, तर ३६ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.