Sunday Special Breakfast: रविवारी नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि चवदार रेशमी पराठा, जाणून घ्या सोपी रेसिपी
esakal June 29, 2025 04:45 PM

Reshmi Paratha Recipe: रविवारच्या सकाळी नाश्त्याला काहीतरी खास आणि चविष्ट बनवायचे असेल, तर रेशमी पराठा हा उत्तम पर्याय आहे. नावाप्रमाणेच हा पराठा मऊ, रेशमी आणि तोंडात विरघळणारा असतो, जो तुमच्या कुटुंबाला नक्कीच आवडेल. हा पराठा बनवायला अत्यंत सोपा आहे आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून तयार होतो. मैदा, दूध आणि तूप यांच्या मिश्रणातून तयार होणारा हा पराठा आपल्या चवीने सर्वांचे मन जिंकतो. रविवारच्या निवांत सकाळी, गरमागरम रेशमी पराठा दही, लोणचे किंवा तुमच्या आवडीच्या ग्रेव्हीसोबत सर्व्ह करा आणि कुटुंबासोबत आनंददायी नाश्त्याचा आनंद घ्या. ही रेसिपी इतकी सोपी आहे की नवशिक्याही सहज बनवू शकतात. चला तर मग, रविवारी सकाळी तुमच्या स्वयंपाकघरात बनवा हा खास रेशमी पराठा. हा पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

रेशमी पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उकडलेले पराठे

बारीक चिरलेली हिरवी मिरची

जिरं

कोथिंबीर

चिली फ्लेक्स

मीठ

गव्हाचे पीठ

पाणी

तेल

View this post on Instagram

A post shared by Bharati Vahagaonkar (@chinus.kitchen_)

रेशमी पराठा बनवण्याची कृती

सर्वात आधी एका भांड्यात उकलेला बटाटा किसून घ्या. नंतर त्यात हिरवी मिरची,जिरं, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, मीठ, गव्हाचे पीठ, पाणी ,तेल मिसळून पीठ चांगले मळून घ्यावे. नंतर थोडा वेळ झाकून ठेवावे.नंतर पराठे लाटून घ्यावे. गरम तव्यावर तेल लावून भाजून घ्यावे. तुम्ही गरमा गरमा पराठे चटणीसोबत किंवा सॉससोबत आस्वाद घेऊ शकता

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.