AI+ Nova 5G: Made-in-India Budget Smartphone with 50MP Camera, 5G Support to Launch at Just ₹5000 on July 8 : भारतीय मोबाईल बाजारात नव्या स्मार्टफोनची एन्ट्री होणार आहे. ८ जुलैला हा मोबाईल फोन लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. AI+ असं या मोबाईलचं नाव आहे. या मोबाईलमध्ये ग्राहकांना 5G सपोर्ट मिळणार आहे. NxtQuantum Shift Technologies या कंपनीने हा फोन बाजारात आणला आहे. या फोनची निर्मितीही भारतातच करण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन पूर्णपणे मेक इन इंडिया असणार आहे.
या फोनमध्ये युजर्सच्या गोपनियततेवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 5 हजार रुपये असणार आहेत. AI+ ब्रँड अंतर्गत AI+ Nova 5G आणि AI+ Pulse 4G, असे दोन स्मार्टफोन बाजारात आणले जाणार आहेत. हे फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बजेट सेगमेंटमधील या फोनची सर्वांना उत्सूकता लागली आहे.
Galaxy M36 5G Mobile : खुशखबर! सॅमसंगने लॉन्च केला Galaxy M36 5G मोबाईल; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स एकदा बघाच.. काय आहेत स्मार्टफोनचे फीचर्स?AI+ Nova 5G मध्ये 6nm Unisoc T8200 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी आहे. याशिवाय, या फोनमध्ये 1TB पर्यंत मेमरी वाढवण्यासाठी एसडी कार्ड स्लॉट उपलब्ध असणार आहे. फोनच्या मागील पॅनलवर रेक्टँगुलर कॅमेरा मॉड्यूल आणि LED फ्लॅश आहे.
याशिवाय Pulse 4G मध्ये 12nm Unisoc T7250 चिपसेट वापरण्यात आला आहे. यातही 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी असणार आहे. Nova 5G प्रमाणेच यातही रेक्टँगुलर कॅमेरा मॉड्यूल डिझाइनचा वापर करण्यात आला आहे.
Budget Mobile Launch : चीनला धोबीपछाड! भारतातील बड्या कंपनीने 7999 रुपयांत लाँच केला 5G स्मार्टफोन; दमदार फीचर्स एकदा बघाच पाच रंगाचा पर्यायAI+ Nova 5G मध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि वॉटरड्रॉप नॉच डिझाइन असेल. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन काळा, गुलाबी, हिरवा, निळा आणि जांभळा अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचा रंग निवडता येईल.