दिलीप कांबळे, साम टिव्ही
पुणे : पुण्यातून आत्ताची सर्वात मोठी आता समोर येत आहे. ती म्हणजे, मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे (वय ८९) यांचं निधन झालंय. मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती. जनसंघ पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. दोनवेळा ते मावळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. काही वर्ष त्यांनी विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले होतं. मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या पश्चात कन्या , जवाई, दोन बहिणी, पुतणे, पुतण्या, भाचे असा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लेख पॅराडाईज राहत्या घरापासून निघणार असून अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी येथे पार पडणार आहे.