बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. आता विद्या बालन एका नवीन भूमिकेत तुमच्या भेटीला येत आहे. विद्या बालन आता मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मात्र यात एक ट्विस्ट आहे. बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन मराठी मालिकेत झळकणार आहे. तसा प्रोमो समोर आला आहे.
View this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
झी मराठीवर कालपासून 'कमळी' (Kamali Marathi Serial ) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत विद्या बालनने धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. हा प्रोमो झी मराठीने शेअर केला आहे. या व्हिडीओत विद्या बालन शिक्षिकाच्या भूमिकेत दिसत आहे. कमळीला विद्या बालन व्यवहार ज्ञानाचे धडे देत आहे. या प्रोमोला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कमळीला मिळणार विद्याची साथ,आजपासून सुरू होणार स्वप्नांचा प्रवास!" या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच प्रेक्षक देखील मालिका पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
व्हिडीओमध्ये विद्या आणि कमळीमध्ये संवाद घडताना दिसत आहे. विद्या कमळीसोबत मराठी भाषेत बोलत आहेत. विद्या कमळीला प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यानंतर विद्या बालन आणि कमळी 'छडी लागे छम छम' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या मजेशीर प्रोमोनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'कमळी' ही नवीन मालिकाझी मराठी वाहिनीवर रात्री 9 वाजता पाहता येणार आहे.
View this post on InstagramA post shared by Vidya Balan (@balanvidya)
विद्या बालनने करिअरच्या सुरुवातीला 'हम पांच' या मालिकेत काम केले आहे. यात तिने अशोक सराफ यांच्यासोबत काम केले. त्यानंतर ती चित्रपटात आली. 'परिणीता' चित्रपटातून विद्या बालनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर तिने अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. यात भूल भुलैया, कहानी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
Paresh Rawal : बाबुरावचं धमाकेदार कमबॅक, परेश रावल 'हेरा फेरी 3'मध्ये झळकणार