इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदी झाली असली तर इस्रायलकडून युद्धाची तयारी सुरु आहे. त्याबरोबर भारतही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. आगामी काळात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी एक खतरनाक मिसाईल जोडली जाणार आहे. ही मिसाईल भारतातून कराची आणि रावळपिंडीवर हल्ला करू शकते. यासाठी भारत इस्रायलसोबत मोठा करार करण्याची शक्यता आहे.
लोरा मिसाईल
लोरा मिसाईल इस्रायली संरक्षण कंपनी IAI ने विकसित केलेली आहे. या मिसाईलचा सुपरसॉनिक वेग आणि 400 किलोमीटरवर हल्ला करण्याची क्षमता तिला वेगळे बनवते. ही मिसाईल जमीन आणि समुद्र अशा दोन्ही ठिकाणांवरून प्रक्षेपित करता येते. त्यामुळे पाकिस्तानचा काटा काढण्यासाठी भारत मोठ्या संख्येने इस्रायली LORA मिसाईल खरेदी करु शकतो.
भारत आणि इस्रायलमधील संरक्षण क्षेत्रातील व्यापार गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रायली हॅरोप आणि हार्पी ड्रोन तसेच रॅम्पेज मिसाईलचा वापर करण्यात आला होता. भारताने आता इस्रायलकडून एअर लोरा क्षेपणास्त्र खरेदी करण्याची योजना आखली आहे. लोरा मिसाईलची खरेदी केल्यास पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
लोरा मिसाईलचे वैशिष्ट्ये
लोरा मिसाईलची किंमत किती?
लोरा मिसाईलची अधिकृत किंमत जाहीर झालेली नाही, मात्र फोर्ब्सच्या अहवालानुसार, एअर लोराची किंमत भारतीय रुपयांमध्ये 8 कोटी रुपये असू शकते. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची किंमत 34 कोटी रुपये आहे, म्हणजे लोराची किंमत ब्रह्मोसच्या एक चतुर्थांश आहे. तर अग्नि 5 ची किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे, म्हणजेच लोरा मिसाईल हे इतर मिसाईल पेक्षा स्वस्त आहे.