Shefali Jariwala Ex Husband: 'आम्ही खाजगी विमानात होतो आणि...'; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर एक्स पतीचा धक्कादायक खुलासा
Saam TV July 02, 2025 02:45 AM

Shefali Jariwala Ex Husband: 'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस १३' फेम म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी शेफाली जगाचा निरोप घेतला आहे. तिचा पती पराग त्यागीला तिच्या निधनाने खूप धक्का बसला आहे, तसेच तिच्या एक्स पती आणि गायक हरमीत सिंगला देखील यामुळे दु:ख झाले आहे. आता हरमीतने शेफालीसोबतच्या त्याच्या शेवटच्या संभाषणाचा उल्लेख केला आहे.

हरमीत सिंगने शेफाली जरीवालासोबत शेवटचा संवाद कुठे आणि कधी झाला हे सांगितले आहे. यादरम्यान, त्या दोघांसोबत एक अभिनेत्री देखील होती. शेफालीच्या मृत्यूनंतर हरमीतने पत्रकार विकी लालवानीशी तिच्या एक्स पती मत मांडले होते.

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाने तिच्या मृत्यूआधी घेतलं होतं हे इंजेक्शन; मैत्रिणीने केला मोठा खुलासा, म्हणाली 'मी तिथेच उभी...'

जेव्हा शेफाली आणि हरमीत यांचे शेवटचे बोलणे झाले

हरमीत म्हणाला, "मी दोन-तीन वर्षांपूर्वी एका शोसाठी बांगलादेशमध्ये होतो. शेफाली आणि सनी लिओनही तिथे होत्या. आम्ही तिघेही एकाच खाजगी विमानातून भारतात आलो होतो. मी शेफालीच्या शेजारी असलेल्या सीटवर बसलो होतो. तेव्हा आमच्या खूप गप्पा झाल्या. काही पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये मी तिला भेटलो. या काळात आम्ही एकमेकांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या."

Paaru Serial: होणार सून मी ह्या घरची...; गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या दिशाची किर्लोसकरांच्या घरात जबरदस्त एन्ट्री

२००४ मध्ये लग्न, २००९ मध्ये घटस्फोट

हरमीत सिंग आणि शेफाली जरीवाला यांचे २००४ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले. तथापि, हे नाते अवघ्या पाच वर्षांतच संपले. दोन्ही कलाकारांनी २००९ मध्ये घटस्फोट घेऊन त्यांचे नाते संपवले. शेफालीने हरमीतवर अनेक आरोप केले होते. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की ती या नात्यात खूश नव्हती.

२०१४ मध्ये परागसोबत दुसरे लग्न

हरमीतपासून वेगळे झाल्यानंतर टीव्ही अभिनेता पराग त्यागीने शेफालीच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघेही एका पार्टी दरम्यान भेटले. यानंतर दोघांनीही २०१४ मध्ये लग्न केले. पण, ११ वर्षांनंतर, या नात्याचा दुःखद अंत झाला. २७ जून, शुक्रवारी रात्री शेफालीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.