Disha Salian Case : ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन ठेवा, नंतर एकत्र..’ दिशा सालियान प्रकरणात नितेश राणेंचा मोठा दावा
GH News July 03, 2025 08:09 PM

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. याविषयी सातत्याने त्यांच्यावर आरोप करणार भाजप नेते, आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. “कोर्टात चालू असलेला मॅटर आहे. त्याबद्दल किती भाष्य करु शकतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. हा नितेश राणेंचा विषय नाही. राजकीय आरोपांचा विषय नाही. दिशा सालियानचे वडील ज्यांनी स्वतची मुलगी गमावली ते राजकीय आरोप करणार आहेत का? ते मुद्दामून कोणाचं नाव घेणार का? त्यांनी जे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं, दिशा सालियानच्या वडिलांनी डिनो मारियो, आदित्य ठाकरे यांची नाव घेतली आहेत. म्हणून मी एवढच सांगेन पिक्चर अजून बाकी आहे. पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. 16 तारीख दिली आहे. त्या तारखेला काय होत ते आपण बघू” असं नितेश राणे म्हणाले.

“राज्य सरकार, आत्ताचे पोलीस त्यांना जे नजरेसमोर दिसलं त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. तुम्हाला आठवत असेल एसआयटी गठीत झाली. त्यात एक अधिकारी होता, तो दिशा सालियान केसमध्ये साथीदार होता. त्याला बदलण्यात यावं, असं पत्र मी दिलेलं. दिशा सालियानच्या वडिलांनी कोर्टात काऊंटर प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. 16 तारखेला काय होतं ते पाहू. पिक्चर अजून बाकी आहे” असं नितेश राणे म्हणाले.

‘एका मुलीने आपलं आयुष्य गमावलय’

“कोर्टात आदित्य ठाकरेने जे प्रतिज्ञापत्र दिलय, त्यात त्याने मी आमदार आहे हे लपवलेलं आहे. मी समाजसेवक, उद्योजक आहे अशी खोटी माहिती दिलेली आहे. कोर्टाला खोटी माहिती देणारे तुमच्या इथे येऊन काय खरं बोलणार?” असं नितेश राणे म्हणाले. “घाईगडबड करु नका. एका मुलीने आपलं आयुष्य गमावलय. एका वडिलांनी आपली मुलगी गमावलीय. माननीय कोर्टात केस चालू आहे” असं नितेश राणे म्हणाले.

‘आगे, आगे देखो होता हैं क्या’

आदित्य ठाकरे म्हणतात माझा या प्रकरणाशी संबंध नाही. नाहक बदनामी सुरु आहे. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “यावर आता उत्तर देण्यापेक्षा आगे, आगे देखो होता हैं क्या, तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन ठेवा. नंतर एकत्र वाजवायला मिळतील”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.