TMKOC Show Update: 'तारक मेहता...' मधून बबिताची झाली एक्झिट? चर्चेनंतर अभिनेत्रीने स्वत: च केला खुलासा
Saam TV July 02, 2025 03:45 PM

टिव्हीवरील लोकप्रिय शो म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. गेली १५ वर्षाहून अधिक तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजही लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण तारक मेहता का उल्टा चश्मा पाहतात.या मालिकेतील कलाकारांमुळे या शोला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र मागील अनेक दिवसांपासून या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेत असल्याचं चित्र दिसत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री बबिता देखील तारक मेहता का उल्टा चश्मा सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडचं लग्न ठरलं का? एका फोटोवरून सोशल मीडियावर होतेय चर्चा

मागील अनेक दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा शोमधून बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता एक्झिट घेणार असल्याचं बोलल जात आहे. यानंतर आता स्वत: मुनमुन दत्तने यावर मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर मुनमुन शोच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने, ' प्रत्येक अफवा ही खरी नसते' अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बबिताचं घर दिसत असून ती तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचं शूटिंग करताना दिसतेय यामुळे बबिता यापुढे मालिकेत दिसणार नाही या सर्व अफवा असल्याचं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by ♀️ (@mmoonstar)

गेल्या अनेक वर्षापासून अभिनेत्री मुनमुन दत्ता तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये काम करत आहे. शोमधील तिची बबिता ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. सोशल मीडियावर देखील मुनमुनचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुनमुन दत्ता तिच्याविषयीच्या अपडेट देत असते. मात्र शोमधून मुनमुन दत्ता दिसणार नसल्याच्या अफवा या खोट्या असल्याचं समोर आलं आहे.

Spruha Joshi: 'सत्ताधारी कुणी विरोधी, मोठी राजघराणी...' हिंदी सक्तीच्या वादावर स्पृहा जोशी काय म्हणाली?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.