Chala Hawa Yeu Dya 2 : 'चला हवा येऊ द्या २'मधून निलेश साबळेची एक्झिट, तर 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री
Saam TV July 02, 2025 03:45 PM

मराठी कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) आता पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोनं अवघ्या जगाला खळखळवून हसवले आहे. या शोमधील कलाकारांनी आपल्या कॉमेडी अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केली आहे. शोमधील स्त्री पात्र तर खूप गाजली आहेत. आता या शो बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

'चला हवा येऊ द्या' शोमध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके यांनी प्रेक्षकांना खूप हसवले. आजही प्रेक्षक जुने भाग आवर्जून पाहतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश साबळेने (Nilesh Sable) केले होते. मात्र आता 'चला हवा येऊ द्या 2'मध्ये शोचे सूत्रसंचालन कोण करणार यासंबंधित चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तेव्हा मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या'चा नवीन सीझन निलेश साबळे होस्ट करणार नसून या ठिकाणी मराठमोळा अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या' शोचे सूत्रसंचालन 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचलेला अभिनेता अभिजीतखांडकेकर (Abhijeet Khandkekar) करणार आहे. आजवर अभिनयासोबत अभिजीतने अनेक शोचे सूत्रसंचालन केले आहे. 'चला हवा येऊ द्या' हा 'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय शो आहे. गेल्या 10 वर्षांपासून या शोने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

अभिजीत खांडकेकर वर्कफ्रंट

अभिजीत खांडकेकरने आजवर अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. त्याची 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका खूप गाजली आहे. त्याने वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेला देखील चाहत्यांनी खूप पसंती दिली. आता 'चला हवा येऊ द्या'चे सेटवर अभिजीत खांडकेकर कसा धुमाकूळ घालतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Ramayana : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची ९ शहरात पहिली झलक, कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.