Apoorva Hiray Joins BJP: राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे भाजपमध्ये; मुंबईत होणार प्रवेश सोहळा
esakal July 02, 2025 10:45 PM

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना ऊत आला होता. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, डॉ. हिरे बुधवारी (ता. २) दुपारी १२ वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात शेकडो समर्थकांसह अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी थेट दूरध्वनीद्वारे डॉ. हिरे यांना पक्षप्रवेशासाठी आमंत्रण दिले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. या चर्चेनंतर प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे डॉ. हिरे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण आणि शहरी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच भाजपच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Year 2025: 84 वर्षे मागे जगतोय आपण! 1941 मध्ये जे घडलं तेच 2025 मध्ये घडतंय; 'कॅलेंडर'सुध्दा सेम टू सेम

या भव्य प्रवेश सोहळ्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातील हजारो समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.