Adult Star Passes Away: एडल्ट स्टार काइली पेजचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन; ड्रगमुळे मृत्यू झाल्याचा संशय
Saam TV July 04, 2025 12:45 AM

Adult Star Passes Away: एडल्ट स्टार काइली पेज हिचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन झाले आहे. २५ जून रोजी ती तिच्या लॉस एंजेलिसच्या घरात मृतावस्थेत आढळली. तिच्या एका मैत्रिणीने काइलीला फोन केला, पण अनेक वेळा प्रयत्न करूनही तिचा संपर्क होऊ शकला नाही तेव्हा तिने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. काइलीच्या घरी पोलिस गेले तेव्हा, ती तिथे मृतावस्थेत आढळली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु पोलिसांना संशय आहे की काइलीचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाला आहे.

वृत्तानुसार, पुढील तपासानंतर, पोलिसांना ड्रग्जच्या अतिसेवनाचा संशय घेण्यासाठी पुरेसे पुरावे सापडले आहेत आणि आतापर्यंत कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाही. पोलिसांना तिच्या मृत्यूच्या वेळी खोलीत विखुरलेले स्टारचे अश्लील फोटो देखील आढळले.

Pakistani Celebrities: फवाद, माहिरा ते शाहिद आफ्रिदी...; भारताने २४ तासांत पुन्हा पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावर घातली बंदी

सूत्रांनी माध्यमांना सांगितले की पोलिसांना काइलीच्या घरातून फेंटानिल आणि ड्रग्जचे साहित्य आढळले, तसेच अपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पुरुषांसोबतचे तिचे अश्लील फोटो देखील विखुरलेले होते. लॉस एंजेलिस मेडिकल एक्झामिनर काउंटीच्या कागदपत्रांनुसार, काइलीच्या मृत्यूची पुढील चौकशी केली जाईल. स्टारच्या मृत्यूची माहिती कॅनेडियन पोर्नोग्राफिक कंपनीसोबत काम करत होती त्या कंपनीने देखील केली आहे.

Ramayana: नितेश तिवारीच्या रामायणमध्ये झळकणार 'हे' बॉलिवूडचे कलाकार

"काइली पेजच्या निधनाबद्दल ऐकून ब्रेझर्स टीमला खूप दुःख झाले आहे," असे कंपनीने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, "काइली तिच्या हास्यासाठी, दयाळूपणासाठी कायम आठवणीत राहिलं. या कठीण काळात आम्ही काइलीच्या कुटुंबाला, मित्रांना आणि चाहत्यांना मनापासून संवेदना देतो."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.