माजी खासदार तथा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडले आहे.
बालपणापासूनच योगासने, सूर्यनमस्कार, पेपर व पुस्तक वाचनाची त्यांना आवड असून विविध खेळातही रूची आहे.
नियमित योगा, प्राणायाम व मागील १५ वर्षांपासून सात्त्विक आहार ते घेतात. यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी दिवसभर ऊर्जा मिळते.
झोपण्यासाठी रात्री उशीर होत असला, तरी सकाळी किमान ६ ते ६ः३० वाजताच्या दरम्यान उठून ते योग, प्राणायाम करतात.
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी विविध खेळ, व्यायाम, वॉकिंग तसेच पाच ते सहा तास झोप हाच फिटनेसचा मंत्र आहे.
रोजच्या आहारात ते घरच्या सात्विक जेवणाला प्राधान्य देतात, हॉटेलचे मसालेदार खाणे तसेच चहा, कॉफी कटाक्षाने टाळतात.
सकाळी ज्यूस, फळे यासाठी प्राधान्य देतो. दिवसभरात नाश्ता, दुपारी जेवण व रात्रीचे जेवणात ते ज्वारीची भाकरी, पालेभाज्यांचा समावेश असतो