पुणे: मोबाईलमधील हिडन ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवून मोबाईल कॅमेरातून खाजगी क्षण पाहायचा. या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (prasad taamdar) असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाचं नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींन बावधन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार या भोंदू बाबाने त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले. एवढेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबाने अशीच अनेकांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पोलिस तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
तुमचा मृत्यू अटळ आहे, असं सांगून त्यावर उपाय म्हणून प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा, असा सल्ला बाबाने काही भक्तांना दिला असल्याचं तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे, शरीरसंबंध सुरू असताना या भोंदू बाबाने मोबाइल दिशादर्शक (नेव्हिगेशन) सुरू करून तो मोबाइल एखाद्या विशिष्ट कोनात ठेवण्यास सांगत होता. त्याद्वारे मोबाइल कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा भोंदू बाबा त्यांचे खासगी क्षण पाहत होता. दरम्यान, एका भक्ताचा मोबाइल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी मित्राकडे दिला असता या मोबाइलमध्ये हिडन ॲप सापडले. यानंतर बाबाचा भांडाफोड होऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबरतज्ज्ञांच्या मदतीने या भोंदू बाबाच्या मोबाइल आणि ॲपची तपासणी करण्यात आली आहे. त्यात भक्तांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळून आले आहे. पोलिसांनी भोंदू बाबाकडील तीन स्मार्ट फोन आणि एक टॅब जप्त केला आहे. यातील एक फोन जुना असून, सध्या दोनच फोन तो वापरत असल्याचे समोर आले आहे. माहितीचे तांत्रिक विश्लेषण करणे आणि त्यातील डिलिट डेटा परत मिळवण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे. त्यासाठी फोन आणि टॅब फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत. पोलिसांनी भोंदू बाबाच्या आश्रमातून 3 मोबाईल, 2 आयपॅड, सोलोपोशे 0.5एमडीच्या गोळ्याचं मोकळं पाकीट, प्रोव्हेनॉलच्या 9 गोळ्या, सिमकार्ड आणि पेन ड्राईव्ह हे साहित्य जप्त केलं आहे. भोंदू बाबा इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच पोलीस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार असून त्यामध्ये नेमका कोणता डाटा आहे याची माहिती घेणार आहेत.दरम्यान भोंदू बाबा कडे तसेच इतर वैद्यकीय औषधही मिळाली आहेत. त्यांचा नेमका वापर काय आहे याचीही तपासणी पोलीस करणार आहेत.
आणखी वाचा