Shefali Jariwala Pass Away : "माझी परी दिसत होती त्यापेक्षाही ..." अभिनेत्री शेफाली जरीवालच्या निधनानंतर पतीची भावुक पोस्ट
Saam TV July 04, 2025 05:45 PM

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रेक्षकांची 'कांटा लगा' गर्ल अनंतात विलीन झाली. अवघ्या ४२ वर्षाच्या अभिनेत्री शेफाली जरीवालच्या आकस्मित निधनाने अखंड सिनेसृष्टी हादरून गेली. शेफालीच्या जाण्याने तिचा नवरा कोलमडला. निधन होऊन आठवडा उलटला असला तरी शेफालीच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. अशातच आता तिच्या निधनानंतर तिच्या पतीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तो म्हणाला "शेफाली माझी परी, सर्वांची आई" याशिवाय त्यांनी चाहत्यांना अफवांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

'कांटा लगा गर्ल' शेफाली जारीवालच २७ जून रोजी निधन झाले. तिच्या अशा अचानक जाण्याने बॉलीवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. शेफालीचा मृत्यू होऊन एक आठवडा उलटला असला तरी तिच्या मृत्यूचे गूढ अजूनही उलगडले नाही. अशातच तिचा पती पराग त्यागीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणाला " शेफाली माझी परी. एकमेव 'कांटा लगा गर्ल' जी आपल्याला दिसायची त्यापेक्षाही कित्येकपटींनी जास्त सुंदर होती. ती ग्रेसमध्ये असलेली आग होती, शार्प, फोकस आणि प्रेरित करणारी स्त्री होती.

Shefali Jariwala : शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? अभिनेत्रीचा मृत्यू औषधांमुळे? तारूण्याच्या नादात जीवाचा घात?

एक अशी महिला जी दृढ हेतूनं जगली. तिचं करिअर, तिचं मन, तिचं शरीर आणि तिच्या आत्म्याला शांत शक्ती आणि अटल दृढनिश्चयाने जोपासायची. पण तिला मिळालेले सर्व टायटल्स आणि यश पलीकडे, शेफाली प्रेमाचं सर्वात निस्वार्थी रूप होती. ती सर्वांची आई होती. नेहमीच इतरांना प्राधान्य देणारी. तिच्या उपस्थितीनंच आपलेपणा आणि सांत्वन करणारी. एक उदार मुलगी. एक समर्पित आणि प्रेमळ पत्नी आणि सिंबाची एक अद्भुत आई होती. एक प्रोटेक्टिव्ह आणि मार्गदर्शक बहीण आणि मावशी. एक अत्यंत निष्ठावंत मैत्रीण जी धैर्यानं आणि करुणेनं तिच्या जवळच्या लोकांच्या पाठीशी उभी राहायची..."

View this post on Instagram

A post shared by Parag Tyagi (@paragtyagi)

पुढे शेफालीचा पती पराग म्हणाला "या दुःखद प्रसंगी अफवांवर विश्वास ठेवणं सहाजिक आहे. पण, शेफालीला तिच्या आठवणींमध्ये आपण जपलं पाहिजे. जशी ती इतरांसोबत वागायची, तिने सर्वांना जो आनंद दिला आहे. तिने अनेकांना त्यांच्या आयुष्यात सावरण्यास मदत केली आहे. मी या थ्रेडची सुरुवात एका सामान्य प्रार्थनेनं करतोय. ही जागा फक्त प्रेमानं भरलेली असावी. बरं करणाऱ्या आठवणींसह. तिच्या आत्म्याला जिवंत ठेवणाऱ्या कथांसह. तिचा हा वारसा असू द्या. एक तेजस्वी आत्मा, ती कधीही विसरली जाणार नाही. तुला कायम प्रेम."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.