Sangli Child Abuse : अल्पवयीन मुलीस दमबाजी करत दोघांनी लैंगिक अत्याचार केला, तर त्या दोन संशयितांच्या मित्रांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गणेश वाघमारे, सोमनाथ आवळे (दोघे रा. विटा ), त्यांचे मित्र शरद व दिलीप (पूर्ण नावे पत्ता माहीत नाही) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी गणेश रवींद्र वाघमारे (वय २२, मायाक्कानगर, विटा) व सोमनाथ जालिंदर आवळे (वय २९, आंबेडकरनगर, विटा) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान, दोघांनाही आज न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले, तर पसार असलेल्या शरद व दिलीपचा शोध पोलिस घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित गणेश वाघमारे याने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पुन्हा पीडितेस दमबाजी करण्यात आली. घरातील लोकांना मारून टाकण्याची धमकीही दिली. त्यानंतर घाबरलेली पीडित वाघमारेच्या घरी गेली. तेथे पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले.
Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपारत्यानंतर पुन्हा पीडिता बहिणीसोबत घरी जात असताना संशयित वाघमारे आणि सोमनाथ आवळे दुचाकीवरून आले. त्यानंतर खानापूर तालुक्यात दोन ठिकाणी नेण्यात आले. त्यावेळी संशयित शरद आणि दिलीप हे दोघेही तिथे आले. वाघमारे याने पीडितेस लग्नासाठी गळ घालली. त्यावेळी पीडितेने नकार दिला.
त्यानंतर संशयित शरद आणि दिलीप यांनी पीडितेचा विनयभंग केला. काही दिवसांनी संशयित आवळे यानेही पीडितेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित वाघमारे व आवळे या दोघांविरुद्ध गुन्हा झाला.