१. भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज इंग्लंडविरुद्ध होणार तिसरा सामना
२. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० अशा आघाडीवर
३. आगामी विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी मालिका विजय महत्त्वाचा
लंडन : एकीकडे शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखालील भारतीय क्रिकेट संघ कसोटीमध्ये इंग्लंडसमोर आव्हान उभे करत असताना हरमनप्रित कौरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला संघही इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये कधीही ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका जिंकलेली नाही. मात्र आता पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. ट्वेंटी-२० मालिकेतील तिसरा सामना आज (ता. ४) होणार आहे.
या मालिकेमध्ये पहिल्या दोन्ही सामन्यांत भारताची फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत चांगली कामगिरी झाली आहे. पहिल्याच सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनाने शतक झळकावले होते. दुसऱ्या सामन्यात जेमिमाह रॉड्रिग्ज आणि अमनज्योत कौर यांनी भरीव कामगिरी केली होती.
View this post on InstagramA post shared by Team India (@indiancricketteam)
याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेली डावखुरी फिरकी गोलंदाज एन श्री चरणीनेही भेदक कामगिरी केली आहे. तिने दोन सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत.
ही मालिका भारतासाठी का महत्त्वाची?२०२६ मध्ये इंग्लंडमध्ये महिलांची ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे ही मालिका भारतासाठी संघबांधणी व नियोजनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.
भारत-इंग्लंड सामना कधी?भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील तिसरा सामना ४ जुलै रोजी म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता या सामन्याची सुरुवात होईल.
1. भारत आणि इंग्लंडमधील तिसरा टी-२० सामना कधी आहे?
➡️ हा सामना ४ जुलै रोजी रात्री ११ वाजता (IST) होणार आहे.
2. भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका कधी जिंकली आहे का?
➡️ नाही, भारताने इंग्लंडमध्ये कधीही महिला टी-२० मालिका जिंकलेली नाही.
3. या मालिकेत आतापर्यंत भारत किती आघाडीवर आहे?
➡️ भारत ५ सामन्यांच्या मालिकेत सध्या २-० ने आघाडीवर आहे.
4. कोणत्या खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे?
➡️ स्मृती मानधना (शतक), जेमिमाह रॉड्रिग्ज, अमनज्योत कौर आणि एन. श्री चरणीने ठसा उमठवला आहे.
5. एन. श्री चरणीबद्दल काय खास?
➡️ या नवोदित डावखुऱ्या फिरकीपटूने तिच्या पहिल्या दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६ विकेट्स घेत भेदक खेळी केली आहे.
6. ही मालिका भारतासाठी का महत्त्वाची आहे?
➡️ २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका संघबांधणी व नियोजनासाठी महत्त्वाची ठरते.