रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आर्थिक टंचाईतून एका निर्दयी मातेने चक्क पोटच्या लेकरालाच विकले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मातेसह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक फायद्यासाठी आणि काही पैशांच्या लालचेपोटी एका निर्दयी मातेने आपल्याच पाच वर्षांच्या मुलाला एका व्यक्तीला विकले. सदर प्रकार 26 जून रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास गुहागार येथील एसटी स्टॅंडमोर उघडकीस आला आहे. घटना उघडकीस येताच दापोली पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 81 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर याला अटक करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजा हिरेमठ या करत आहेत.