India vs England 2nd Test Day 3 Live Updates in Marathi Cricket News : भारत-इंग्लंड कसोटीत नाट्यमय वळणं पाहायला मिळत आहेत. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेने वाटचाल केलीय, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. तिसऱ्या दिवसाच्या खेळात हॅरी ब्रूक व जेमी स्मिथ यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती. पण, आकाश दीपने ही ३०३ धावांची विक्रमी भागीदारी तोडून सामन्याला कलाटणी दिली. मोहम्मद सिराजने सहा विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल विक्रमाची नोंद करून माघारी परतला असला तरी भारताकडे मजबूत आघाडी आहे.
शुभमन गिल ( २६९), यशस्वी जैस्वाल ( ८७) व रवींद्र जडेजा ( ८९) सह अन्य फलंदाजांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ५८७ धावा उभ्या केल्या. इंग्लंडचे पाच फलंदाजांना अवघ्या ८४ धावांवर माघारी परतले होते, परंतु हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी सहाव्या विकेटसाठी ३६८ चेंडूंत विक्रमी ३०३ धावांची भागीदारी केली. हॅरी ब्रूक १५८ धावांवर आकाश दीपच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि सामना फिरला. इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर गडगडला. मोहम्मद सिराजने सहा, तर आकाश दीपने चार विकेट्स घेतल्या. स्मिथ २०७ चेंडूंत २१ चौकार व ४ षटकारांसह १८४ धावांवर नाबाद राहिला.
IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing१८० धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारताने दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल व केएल राहुल यांनी ७,४ षटकांत ५१ धावा फलकावर चढवल्या. जॉश टंगच्या गोलंदाजीवर यशस्वी पायचीत झाला. यशस्वीने २२ चेंडूंत २८ धावा केल्या आणि एक विक्रम नावावर केला. भारताकडून कसोटीत सर्वात कमी डावांत २००० धावांचा विक्रम त्याने नावावर केला. त्याने ४० डावांत हा टप्पा ओलांडून राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग यांच्याशी बरोबरी केली.
भारताने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६४ धावा करताना २४४ धावांची आघाडी घेतली आहे. लोकेश राहुल ३८ चेंडूंत २८ धावांवर नाबाद आहे आणि करुण नायरही मैदानावर आहे.
SENA कसोटी मालिकेत भारतीय सलामीवीरांनी सर्वाधिक वेळा २००+ धावा केल्या
५ - सुनील गावस्कर
५ - केएल राहुल*
3 - वीरेंद्र सेहवाग
२ - विजय मर्चंट
२ - विनू मांकड
२ - फारोख अभियंता
२ - चेतन चौहान
२ - रवी शास्त्री
२ - गौतम गंभीर
२ - मुरली विजय
२ - यशस्वी जैस्वाल*
भारतासाठी सलामीवीर म्हणून कसोटीत २००० धावा पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी डाव
३९ - वीरेंद्र सेहवाग
४० - रोहित शर्मा
४० - यशस्वी जैस्वाल*
४१ - गौतम गंभीर
४३ - सुनील गावस्कर
४८ - नवज्योतसिंग सिद्धू
४८ - मुरली विजय
४९ - शिखर धवन
५५ - केएल राहुल