हॉलची मांडणी हवी आकर्षक
esakal July 05, 2025 12:45 PM

हॉल म्हणजे दिवाणखाना ही घरातील सर्वांत महत्त्वाची जागा असते. आपण आपला घरातील सर्वांत जास्त वेळ हॉलमध्येच घालवतो आणि बाहेरचे लोक येतात, तेव्हा तेही हॉलवरून संपूर्ण घराचा अंदाज करत असतात. त्यामुळे हॉलची मांडणी आणि सजावट उत्तमच हवी. एक सुसज्ज आणि व्यवस्थित हॉल घराला सुंदर आणि आकर्षक स्वरूप देतो. त्याला आकर्षक बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया.

जागेचे योग्य नियोजन  

  • हॉलमधील सोफे, खुर्च्या, टीव्ही युनिट यांची मांडणी करण्यापूर्वी जागेचा आकार आणि आकारमान समजून घ्या.  

  • जास्त फर्निचर ठेवून जागा गचाळ करू नका.  

  • वापरात नसलेल्या वस्तू काढून टाका.  

फर्निचरची योग्य रचना  

  • सोफा सेट हा हॉलचा मुख्य आकर्षण असतो, त्यामुळे तो भिंतीलगत ठेवा.  

  • - सेंटर टेबल सोफ्यापासून थोड्या अंतरावर ठेवा- जेणेकरून चालताना अडथळा होऊ नये.  

  • टीव्ही किंवा मध्यवर्ती भागाकडे लक्ष वेधणारी व्यवस्था करा.  

रंगसंगतीची योग्य निवड  

  • हॉलसाठी हलके आणि उत्साहवर्धक रंग निवडा (उदा. पांढरा, क्रीम, पिवळा, पेस्टल).  

  • जास्त गडद रंग टाळा, कारण त्यामुळे जागा लहान दिसू शकते.  

  • कुशन, पडदे आणि वॉल आर्ट यांचा अतिशय नेमका आणि सुंदर वापर करा.

प्रकाशयोजना

  • नैसर्गिक प्रकाशावर भर द्या. जास्तीत जास्त खिडक्या उघड्या ठेवा.  

  • सेंटर लाइट (झुंबर), वॉल लाइट्स आणि एलईडी स्ट्रिप्सचा वापर करून हॉलला मॉडर्न लूक देऊ शकता.  

उत्तम सजावट  

  • भिंतीवर फोटो फ्रेम्स, पेंटिंग्ज किंवा वॉल आर्ट लावा.  

  • हिरव्यागार झाडांच्या छोट्या कुंड्या, उत्तम फ्लॉवरपॉट किंवा अगदी कृत्रिमफुलेदेखील वापरून तुम्ही हॉलला निसर्गाचा स्पर्श देऊ शकता.  

  • एक छोटा बुकशेल्फ किंवा शो पीस ठेवून हॉलला पर्सनल टच द्या.  

स्टोरेज सोल्युशन्स  

  • हॉलमध्ये कुटुंबीय जास्त वेळ असल्यामुळे त्यांच्या वस्तूही तिथे असतात. त्या ठेवण्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे असते

  • मल्टी-फंक्शनल फर्निचर (स्टोरेज सोफा, ड्रॉवर) वापरून जागा वाचवू शकता.  

गालिचा किंवा मॅट

  • मोकळ्या जागेत सुंदर गालिचा घालून हॉलला उत्तम बनवू शकता.

हॉलची मांडणी करताना साधेपणा, कार्यक्षमता आणि सौंदर्य यांचा समतोल राखा. हॉल जितका स्टायलिश, आरामदायी आणि स्वागतशील असेल, तितकं त्याचं प्रतिबिंब तुमच्या घरावर पडत असतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.