मुंबईत आज विजय मेळावा; राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकाच मंचावर, ठाकरे बंधूंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष
Tv9 Marathi July 05, 2025 12:45 PM

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक पक्षांनी आणि संघटनांनी घेतली होती. मनसेनं हिंदी सक्तीच्या मुद्यावर मोठं आंदोलन केलं, त्यानंतर या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटानं देखील उडी घेतली.  पाच जुलै म्हणजे आज याविरोधात भव्य असा मोर्चा निघणार होता, या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार होते. मात्र सराकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही अध्यादेश रद्द केले, त्यामुळे हा मोर्चा देखील मागे घेण्यात आला.

मात्र त्यानंतर आज आता मुंबईमध्ये विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळी डोम येथे हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात ठाकरे बंधू काय बोलणार? याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  सरकारने त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश वापस घेतल्यानंतर आता या मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, या पार्श्वभूमीवर देखील या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सरकारने त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे घेतला आहे. त्यानंतर आता नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच आता याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आता आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू उपस्थिती राहणार आहेत. हा मेळावा वरळी डोम येथे होणार असून जय्यत तयारी करण्यात  करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.