१३ हजाराहून अधिक कोटींच्या पीएनबी घोटाळा प्रकरणात देश सोडून पळालेला नीरव मोदी याचा भाऊ नेहल दीपक मोदी याला अटक झाल्यानंतर त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार त्याला भारतीय तपास यंत्रणाच्या मागणीवरुन अटक झाली आहे. नेहल मोदीवर नीरव मोदीला घोटाळ्यात मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्यावर पुरावे लपवणे, साक्षीदारांना धमकावणे, घोटाळ्यातील पैसा आणि संपत्तीला लपवण्यात सक्रीय सहभागाचा आरोप लावण्यात आला आहे.
तपास यंत्रणाच्या नुसार जेव्हा भारतात तपास सुरु झाला तेव्हा नेहल याने दुबई स्थित Firestar Diamond FZE कंपनीकडून ५० किलो सोने घेतले आणि ते गायब केले. तो स्वत: सर्व परिस्थिती हाताळत होता. आणि त्याच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व आवश्यक रेकॉर्ड, खाती आणि डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न करीत होता.
हाँगकाँगहून ५० कोटीची ज्वेलरी ताब्यात घेतली
नेहल मोदी याने हाँगकाँगहून सुमारे ६ अब्ज डॉलर ( सुमारे ५० कोटी रुपये ) ची डायमंड ज्वेलरी, १५० बॉक्स मोती आणि दुबईतून ३.५ दशलक्ष दीरहम कॅश तसेच ५० किलो सोने आपल्या ताब्यात घेतले. या सर्व कामासाठी त्याने त्याचा अन्य एक साथीदार मिहिर भंसाळी याची मदत घेतली.
सक्तवसुली संचनालयाच्या (ED) आरोपानुसार नेहल याने न केवळ फिजिकल पुरावे हटवले, कर डिजिटल पुरावे उदाहरणार्थ मोबाईल फोन आणि सर्व्हरला देखील नष्ट केले. दुबईतील सर्व डिजिटल डेटा संपूर्णपणे नष्ट केला आहे.
नेहल मोदी याने काही साक्षीदारांना घाबरुन कैरोला (Cairo) पाठवले, तेथे त्यांचे पासपोर्ट जब्त करण्यात आले. आणि त्यांच्याकडून खोट्या दस्ताऐवजांवर सह्या घेतल्या गेल्या. एक प्रकरणात तर नेहल याने एका साक्षीदारास २ लाख रुपयांची लाच देऊन युरोपच्या कोर्टात खोटी साक्ष देण्यास राजी केले.
ED च्या मते नेहल मोदी याने PMLA कायद्याचे कलम ३ अंतर्गत मनी लॉन्ड्रींगमध्ये सामील राहून गुन्हा केला आहे. आणि त्याला कलम ४ अंतर्गत कठोर शिक्षा व्हायला हवी. भारत सरकारने नेहम मोदी याच्या प्रत्यार्पणाची अधिकृतपणे मागणी केली होती. त्यावर अमेरिकेच्यावतीने कारवाई झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नेहल मोदी याला भारतात आणण्याची प्रक्रीया सुरु होणार आहे.
नेहल मोदी याच्या प्रत्यार्पण प्रकरणात आता १७ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. यावेळी नेहल जामीनासाठी देखील अर्ज करु शकतो. पीएनबी घोटाळ्यात भारताच्या तपास यंत्रणांना मिळालेले हे मोठे यश म्हटले जात आहे. साल २०१९ मध्ये इंटरपोलने नेहल मोदी यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. त्याआधी त्याचा भाऊ नीरव मोदी आणि निशाल मोदी यांच्या विरोधात इंटरपोलने नोटीसी जारी केल्या होत्या. नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात बंद आहे.आणि त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रीया चालु आहे. नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोक्सी पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून यांनी १३ हजार कोटीचे कर्ज बुडवले आहे.