Hotel Bhagyashree: धाराशिवमधल्या हॉटेल भाग्यश्रीवर मोठी गर्दी होत असते. त्यामुळे काही गैरप्रकारदेखली घडतात. गर्दीमध्ये काही लोक फुटक मटण खाऊन जात असल्याचे प्रकार घडत आहेत. एवढंच नाही तर घेतलेलं टोकन माघारी करण्याचा बहाणा करुन काहीजण पैसेदेखील उकळत आहेत. आता हा प्रकार मालकाच्या लक्षात आलेला आहे.
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी याबाबत माहिती देत टोकन सिस्टीम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितलं. त्याऐवजी हॉटेलमध्ये बिलिंग मशिन बसवण्यात आलेली आहे. मशिमधून येणाऱ्या चिठ्ठीमध्ये तारीख, वेळ दिसेल आणि गैरप्रकार बंद होणार आहेत. काही लोक गर्दीचा गैरफायदा घेत असल्याने हा बदल करण्यात आलेला आहे.
मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEOहॉटेलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नागेश मडके म्हणतात की, यापूर्वी आपण टोकन सिस्टीम केलेली होती. परंतु लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करु लागले. काहीजण बाहेरुन टोकन घेऊन येतात आणि फुकटमध्ये जेवण करतात. तर काहीजण उशीर होतोय असा बनाव करुन टोकन माघारी देऊन पैसे मागतात.
ही फसवणूक टाळण्यासाठी हॉटेल भाग्यश्रीमध्ये आता बिलिंग मशिन लागली आहे. या मशिनमधून येणाऱ्या चिठ्ठीवर तारीख, वेळ येणार आहे. शिवाय मेन्यू कमी-जास्त करता येतील. माझ्यासारख्य अंगठाछाप व्यक्तीलाही हे बिल काढता येणार आहे, असं मडके यांनी सांगितलं.
View this post on InstagramA post shared by Laila Thoraat hotel Bhagyashree (@hotel_bhagyshree_)
दरम्यान, हॉटेल भाग्यश्रीचा पत्ता बुधवारपासून बदलणार आहे. हॉटेल नवीन जागेमध्ये स्थलांतरित होणार आहे. सध्याच्या ठिकाणापासून पाच किमोमीटर अंतरावर हे हॉटेल स्थलांतरित होईल. तिथे तब्बल एक एकर जागेमध्ये हॉटेल विस्तारित होणार आहे. त्यामुळे पार्किंगची सोयदेखील होणार होईल. मडके यांनी याबद्दल माहिती दिली.