सुरेश मेंगडे यांच्याकडून गण्या डोंगरावर वृक्षारोपण
esakal July 05, 2025 10:45 PM

पारगाव, ता. ५ : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) गावचे सुपुत्र सुरेश मेंगडे यांची पोलिस उप महानिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्या हस्ते गण्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.
सुरेश मेंगडे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल गावाने त्यांचा नागरी सत्कार करण्याचे ठरविले असता त्यांनी सत्कार घेण्याऐवजी वटवृक्ष मेंगडेवाडी फाउंडेशनतर्फे गण्या डोंगर परिसरात सुरु असलेल्या वृक्षारोपण उपक्रमामध्ये झाडे लावण्याचे ठरवून व विविध प्रकारचे देशी रोपांची लागवड केली. यावेळी वटवृक्ष मेंगडेवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर रणपिसे, ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष जयवंत मेंगडे, संजय मेंगडे, जयदास तावरे, गणेश मेंगडे, सुनील मेंगडे, साहेबराव मेंगडे आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.